महाबळेश्‍वर - पंढरपूर बससेवेचा पुन्हा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

या सेवेचा लाभ घेऊन एसटीच्या उत्पन्न वाढीत प्रवाशांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगे यांनी केले.

केळघर ः प्रवाशांच्या मागणीनुसार महाबळेश्‍वर आगाराच्या वतीने महाबळेश्वर- पंढरपूर ही एसटी बस पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेऊन एसटीच्या उत्पन्न वाढीत प्रवाशांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगे यांनी केले. महाबळेश्वर बस स्थानकात पुन्हा सुरू करण्यात आलेल्या महाबळेश्‍वर- पंढरपूर बसचे पूजन करून ती पंढरपूरकडे रवाना करण्यात आली.
 
महाबळेश्‍वरमधून ही बस दुपारी अडीच वाजता सुटते, तर पंढरपूरमधून ही बस दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला सुटणार आहे. या वेळी स्थानक प्रमुख पी. पी. मुठे, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, वाहतूक नियंत्रक चंद्रकांत वळकुंदे, शिवाजी भोसले, वाहक संतोष सावंत, चालक दत्ता देशमुख, सागर वाघ, देविदास खाडे, संभाजी भिसे, अमित देवरे यांच्यासह चालक, वाहक, कामगार उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahabaleshwar - Pandharpur bus service resumed