महाबळेश्‍वरः तहसील कार्यालयात लाच घेताना लिपीक जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

सातारा: महाबळेश्‍वर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात 15 हजार रुपयांची लाच घेताना क्‍लर्कला आज (गुरुवार) लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. अमोल सलागरे असे लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

निवडणूकीसाठी 50 खासगी चार चाकी वाहने वापरण्यात आल्या होत्या. ही वाहने देणाऱ्या ठेकेदाराकडे सलागरे याने प्रत्येक वाहनास 300 रुपये याप्रमाणे 15 हजार रुपयांची मागणी केली होती. महाबळेश्‍वरच्या तहसील कार्यालयात ही रक्कम स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. यासंबंधी महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: Mahabaleshwar: tehsil office clerk take a bribe