वास्तुकलेचा उत्तम नमुना महादरे पाहण्यास गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

सातारा  - महादरे तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ झाल्याने तलाव रिकामा झाला आहे. त्यामुळे हा तलाव पाहण्यास नागरिक गर्दी करू लागले आहेत. 

पश्‍चिमेला तळ्यात उतरण्यासाठी पायथ्यापर्यंत पायऱ्या, दक्षिणोत्तर दिशांना दोन जिने, वॉशआउट करण्यासाठी विशिष्ट रचना, २६५ फूट लांबी व २५० फूट रुंद तसेच सुमारे ४० फूट खोलीचे दगडी बांधकाम... छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी शहराच्या पाण्याची सोय करण्यासाठी शहराच्या पश्‍चिमेस महादरे तलाव बांधला. ऐतिहासिक वास्तूकलेचा उत्तम नमुना असलेल्या दगडी बांधकामातील तलावाची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहिल्यानंतर थक्क व्हायला होते. 

छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी १८२९ मध्ये एक लाख रुपये खूर्चन महादरे तलाव बांधून घेतल्याची नोंद सरकारी दप्तरात आढळते. २६५ फूट लांबी आणि २५० फूट रुंदी असलेले महादरे तळे ४० फूट खोल आहे. संपूर्णपणे दगडी बांधकाम करण्यात आले आहेत. पश्‍चिमेस तळ्यात उतरण्यासाठी आखीव-रेखीव दगडी पायऱ्या आहेत. सातत्याने पाण्यात राहून त्यातील काही तुटल्या असल्या तरी बहुतांश पायऱ्या अद्याप जागेवर आहेत. दक्षिण व उत्तर बाजूकडून आत उतरण्यासाठी बांधीव पायऱ्यांचा जिना आहे. हा जिना तळ्याच्या भिंतीमधून खाली उतरतो. याही जिन्यात तळ्याचे पाणी साचत असले तरी बांधकाम शाबूत व मजबूत आहे. 

यवतेश्‍वर डोंगरातून वाहून आलेले पाणी हत्ती तळ्यात जमा होते. नंतर हेच पाणी नैसर्गिक पद्धतीने शुद्ध करून महादरे तळ्यात जाते. शुद्धीकरणाची ही यंत्रणा जमिनीअंतर्गत असल्याने जलशुद्धीकरणाच्या कार्यपद्धतीचा बोध आधुनिक अभियांत्रिकी शाखेला होत नाही. काही कारणे किंवा स्वच्छतेसाठी तळ्यातील पाणी काढण्याची वेळ आली तर त्यासाठी तळ्याच्या पूर्वेस चार डब्यांची व्यवस्था आहे. 

पाणी खराब करण्यास मनाई
‘शहर सातारा येथील म्युनिसिपल कमिटीकडून या तळ्यात धुण्याची व अंघोळ करण्याची व हरेकप्रकारे पाणी खराब करण्याची मनाई आहे. सर्वांस कळावे,’ असा मजूकर मराठीतून व त्याखाली इंग्रजीतून लिहिला आहे. तशी ब्रिटिशकालीन फरशी तळ्याच्या दक्षिण बाजूस पाहायला मिळते. 

Web Title: mahadare Architecture