महादेव जानकर यांनी धरला धनगरी ढोलावर ताल (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

येथील पालिकेच्या प्रचारासाठी मंत्री जानकर यांनी आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी धनगरांच्या ढोलावर ताल धरला. त्यांच्या समवेत अतुल भोसले यांनीही ताल धरल्याने त्याला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रचार दौर्‍यात मंत्री जानकर यांनी नागरिकांशी थेट घरोघरी भेटून संवाद साधला.

मलकापूर (ता. कऱ्हाड) : दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी चक्क आज येथे धनगरी ढोलावर ताल धरला. त्यांना विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल बोसले यांनी साथ दिली.

येथील पालिकेच्या प्रचारासाठी मंत्री जानकर यांनी आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी धनगरांच्या ढोलावर ताल धरला. त्यांच्या समवेत अतुल भोसले यांनीही ताल धरल्याने त्याला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रचार दौर्‍यात मंत्री जानकर यांनी नागरिकांशी थेट घरोघरी भेटून संवाद साधला. 

भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांच्यासह भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सकाळी अकराच्या सुमारास मंत्री जानकर यांचे मलकापूरात आगमन झाले. तेथे त्यांचे स्वागत झाले. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकार साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, शेतीमित्र अशोकराव थोरात, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबा गावडे उपस्थीत होते. डॉ. गावडे यांच्या निवास्थानापासून सुरू असलेली पदयात्रेचा आहिल्या चौकमार्गे बिरोबा मंदिर येथे पोचली.

श्री बिरोबाचे दर्शन घेतल्यानंतर पुढे आबा गावडे यांच्या निवासस्थानी समारोप झाला. मात्र सगळ्यांच्या लक्षात राहिला तो मंत्री जानकर यांच्यासह श्री. भोसले यांनी धरलेला धनगरी ढोलाचा ताल. मंत्री जानकर धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांचे येथे आगमन होताच धनगरी ढोलांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. बिरोबा मंदीराच्या आवारातच मंत्री जानकर व श्री. भोसले यांनी स्वत: गळ्यात ढोल अडकवून ठेका धरला. त्यांच्या ढोल वादनावर उपस्थित धनगर समाजबांधवही काही काळ थिरकले.

Web Title: Mahadev Jankar beaten dhol in Karhad