महादेव जानकर यांना शेतकऱ्याची शिवीगाळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

नगर - दूध दरवाढीबाबत मांडवे (ता. नगर) येथील शेतकरी सदाशिव मारुती निमसे याने दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना काल (सोमवारी) फोन करून शिवीगाळ केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याबाबत पोलिस या शेतकऱ्याचा शोध घेत असून, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

मांडवे येथील सदाशिव निमसे याने काल थेट मंत्री जानकर यांना फोन केला. मात्र जानकर यांनी फोन घेतला नाही. त्यानंतर निमसे यांनी पुन्हा फोन करून जानकर यांना असभ्य भाषेत दूध दरवाढीसंदर्भात विचारणा केली. जानकर यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना माहिती दिली. पोलिसांनी मांडवे येथे जाऊन निमसे याचा शोध घेतला. मात्र तो घरी सापडला नाही. पोलिसांनी त्याच्या वडिलांकडे विचारपूस करून मुलाच्या कृत्याची त्यांना माहिती दिली.

दरम्यान, निमसे याचा पोलिस शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याचा मागावर आहे. निमसे याने फोनवर जानकर यांना शिवीगाळ केली. त्या वेळी त्याने मद्यप्राशन केले होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.

फोन करणाऱ्या शेतकऱ्याने मंत्री जानकर यांना शिवीगाळ केली आहे. तो सापडल्यानंतर चौकशी करून कारवाई केली जाईल.
- रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक

Web Title: mahadev jankar farmer crime police