महादेव तांबडे नवे पोलिस अधीक्षक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा पोलिस अधीक्षकपदी महादेव तांबडे यांची आज नियुक्ती झाली. सध्याचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची पदोन्नतीवर पुणे पश्‍चिम विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. दरम्यान, कोल्हापुरातील कामावर आपण समाधानी आणि आनंदी असल्याची प्रतिक्रिया देशपांडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. तर सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे श्री. तांबडे यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता 7 जानेवारीला लागू होणार असल्याने येत्या दोन दिवसांतच श्री. तांबडे पदभार स्वीकारणार असल्याचे कळते. 

""कोल्हापूरने मला नवी ओळख दिली. आव्हानात्मक परिस्थिती होती त्या काळातच मी पदभार स्वीकारला. ज्या शहरात शिक्षण घेतले तेथेच पोलिस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. हे भावनिक नाते होते. दुर्लक्षित राहिलेल्या पोलिसांच्या सुमारे 1200-1300 घरकुल निर्मितीला माझा हातभार लागला, मी योगदान देऊ शकलो, हा आनंद आयुष्यभर बरोबर राहणार आहे. लवकरच त्याचे काम सुरू होईल. शाहूपुरी पोलिस ठाण्याची नूतन इमारत उभारण्याचे कामही माझ्या कारकीर्दीत सुरू केले. पोलिसांसाठी आवश्‍यक इन्फ्रास्ट्रक्‍चरचे काम आणि माझ्या काळात चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मी कोल्हापुरातील कारकीर्दीबद्दल समाधानी आणि आनंदी आहे. कोल्हापूर कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील,'' अशी प्रतिक्रिया प्रदीप देशपांडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

दरम्यान, प्रदीप देशपांडे प्रशिक्षणासाठी दीड महिना बाहेर असताना प्रभारी कार्यभार स्वीकारलेले महादेव तांबडे यांचीच कोल्हापुरात नियुक्ती झाली आहे. सध्या ते पोलिस अधीक्षक अन्वेषण विभाग (गुन्हे), पुणे येथे कार्यरत आहेत. दोन दिवसांत ते कोल्हापुरात कार्यभार स्वीकारणार आहेत. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज सायंकाळी "सकाळ'जवळ व्यक्त केली.

Web Title: Mahadev tambde new superintendent