आमदार सतेज पाटील मुंबईला एकटे जातील का? - महादेवराव महाडिक

सुनील पाटील
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - लोकशाही मेली काय? हे विचारण्यासाठी मी आमदार सतेज पाटील यांच्या घरी गेलो होतो. याला हे बंद, त्याला ते बंद ही काय पद्धत आहे का? हे विचारण्यासाठी मी एकटाच त्यांच्या घरी गेलो होतो. पण आमदार सतेज पाटील घरात नसल्याने त्यांची भेट झाली नसल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी "सकाळ'' शी बोलताना सांगितले.

कोल्हापूर - लोकशाही मेली काय? हे विचारण्यासाठी मी आमदार सतेज पाटील यांच्या घरी गेलो होतो. याला हे बंद, त्याला ते बंद ही काय पद्धत आहे का? हे विचारण्यासाठी मी एकटाच त्यांच्या घरी गेलो होतो. पण आमदार सतेज पाटील घरात नसल्याने त्यांची भेट झाली नसल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी "सकाळ'' शी बोलताना सांगितले.  हे बावड्यात बाहेर पडतील आणि कोल्हापुरातून मुंबईला कधी एकटे जातील का? असा सवालही त्यांनी केला. 

काल आमदार सतेज पाटीस व राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार पत्रकार परिषद घेऊन महाडिक यांना बावड्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला होता. यावर महाडिक आज स्वतःच या दोघांना भेटायला गेले. 

श्री. महाडिक म्हणाले, गोकुळच्या करवीर तालुका संपर्क सभेत राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांच्यासोबत जो प्रकार झाला तो पूर्णतः चुकीचा आहे. त्यांना झालेली मारहाण हे मलाही पटले नाही. असा प्रकार कधीच होऊ नये. सभासद लहान असो किंवा मोठा त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे संचालकांनी किंवा सत्तारूढ लोकांनी दिलीच पाहिजेत. नेजदार यांच्या बाबतीत झालेला प्रकार कोणी केला हे मलाही माहिती नाही. पण  कोणाच्या तरी अंगावर हात टाकने हा प्रकार चुकीचा आहे. पण यालाही बंद त्याला ते बंद त्याला इतर फिरू देणार नाही असेही म्हणणे चुकीचे आहे, असेही महाडिक यांनी सांगितले.

Web Title: Mahadevrao Mahadik Comment