सभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट होईल,’ असा विश्‍वास संघाचे नेते महादेवराव महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केला.

कोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट होईल,’ असा विश्‍वास संघाचे नेते महादेवराव महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केला.

श्री. महाडिक म्हणाले, ‘‘गोकुळ राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ आहे. राज्य आणि देशातील संघ ज्या सुविधा देत नाहीत, त्या सुविधा संघ उत्पादकांना देतो. संघाचा व्याप दिवसेंदिवस वाढतो आहे. संघाच्या या प्रगतीत दूधउत्पादक, कर्मचारी, वितरक या सर्वांचाच सहभाग आहे. संघ मल्टिस्टेट होण्याचा फायदा 
सभासदांनाही होणार आहे. आम्ही संघहिताचे निर्णय घेतो; म्हणूनच आमच्या हातात सत्ता दिली आहे. सभासदांच्या या विश्‍वासानेच आम्ही मल्टिस्टेटचा निर्णय घेतला आहे.’’

‘राजकारण करण्यासाठी निवडणुकीचे मैदान आहे. त्या मैदानात लढण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत; मात्र गोरगरिबांच्या संघात राजकारण आणू नका,’ असा इशारा महाडिक यांनी विरोधकांना दिला. संघाच्या माध्यमातून इथल्या उत्पादकांचा विकास होणार आहे. देशात गोकुळ दूध संघाचा दबदबा निर्माण होणे, हे सर्व कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद राहणार आहे. त्यामुळे विरोधाला विरोध न करता सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिणेतून अमल महाडिकच 
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावर आहे. येथून विद्यमान आमदार अमल महाडिक हेच निवडणूक लढवतील, असे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mahadevrao Mahadik comment