महादेवराव महाडिक यांनी घेतली ॲड. श्रीपतराव शिंदे यांची भेट

महादेवराव महाडिक यांनी घेतली ॲड. श्रीपतराव शिंदे यांची भेट

गडहिंग्लज - आगामी लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक हे पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. आज ते गडहिंग्लजच्या दौऱ्यावर आले होते. जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. ‘कोणाला शब्द देऊ नका, आम्हाला मदत करायला पाहिजे...’ अशी विनंतीही त्यांनी शिंदे यांना केल्याचे समजते.

या दौऱ्यात श्री. महाडिक यांनी गोडसाखरचे संचालक व भाजपचे प्रमुख प्रकाश चव्हाण, सदानंद हत्तरकी, जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, गोडसाखरचे माजी संचालक बी. टी. पाटील, माजी जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी, हिराशुगर साखर कारखान्याचे संचालक उदयकुमार देसाई यांचीही भेट घेऊन धनंजय यांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्यासोबत वसंत नंदनवाडे, अमोल हातरोटे यांच्यासह कार्यकर्ते होते.

काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जानेवारीत गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते. त्या वेळी श्री. पवार यांनी ॲड. शिंदे यांच्या घरी नाष्टा घेतला. त्यानंतर एका खासगी कार्यक्रमात ॲड. शिंदे व त्यांची कन्या नगराध्यक्षा स्वाती कोरी यांचे कौतुक केले. त्या वेळी पवार यांनी, स्वाती कोरी यांच्यावर आता आमचा भरोसा आहे, असे उद्‌गार काढून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीसोबत येण्याचेच निमंत्रण त्यांना दिले. 

गेल्या महिन्यात संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांनीही शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. महादेवराव महाडिक यांनी अर्धा तास शिंदे यांच्याशी चर्चा करून कोणाला शब्द न देण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येते.

महाशिवरात्री अन्‌ ‘महादेव’राव
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवराव महाडिक यांनी गडहिंग्लजचा दौरा केला. गिजवणेत सतीश पाटील यांच्या भेटीसाठी घरी गेल्यानंतर आज महाशिवरात्रीदिवशी साक्षात आपले (महादेवांचे) दर्शन घडल्याचे श्री. पाटील यांनी म्हणताच महाडिकांसह उपस्थितांतही हशा पिकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com