...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

यावर्षी कोल्हापूर लोकसभेसाठी खासदार धनंजय महाडिक हा अश्‍वमेघ सोडला आहे. शिराळ्यातून सम्राट महाडिक. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून अजून अमल महाडिक यांना लढण्यासाठी विचारलेच कोठे? ते नसतील तर आपण स्वत: लांग घालून तयारच आहे, असे सूचक वक्‍तव्य महाडिक यांनी केले.

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे? जर ते तयार नसतील तर मी स्वत:ता लांग घालून तयार असल्याचे सुतोवाच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केले. कॉफी वुथ "सकाळ' या उपक्रमावेळी ते बोलत होते. याच मतदार संघातून माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्याविरूध्द केवळ 22 दिवसांचा प्रचार करून अमल महाडिक विजयी झाले होते. 

श्री. महाडिक म्हणाले, "गेल्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. आपण स्वत: त्यांना निवडणूक लढविण्यास भाग पाडले. मला या विधानसभा मतदार संघातील गावे अजून माहिती नाहीत. निवडणूक लढवायची तर प्रचार करायला पाहिजे, अशी कारणे अमल महाडिक यांच्याकडून सांगितली जात होती. तरीही, प्रचार कसा करायचा, निवडून कसे यायचे हे मी पाहतो, तुम्ही फक्त अर्ज भरा असे सांगून मी त्यांना उभे केले आणि अमल महाडिक यांना विजयी केले. तेवढी ताकद माझ्यामध्ये आहे. '' 

यावर्षी कोल्हापूर लोकसभेसाठी खासदार धनंजय महाडिक हा अश्‍वमेघ सोडला आहे. शिराळ्यातून सम्राट महाडिक. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून अजून अमल महाडिक यांना लढण्यासाठी विचारलेच कोठे? ते नसतील तर आपण स्वत: लांग घालून तयारच आहे, असे सूचक वक्‍तव्य महाडिक यांनी केले.

Web Title: Mahadevrao Mahadik talked about contest on election in Kolhapur