महादेवराव महाडिक बंटी पाटलांच्या दारी 

लुमाकांत नलवडे
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज सकाळी आठच्या सुमारास थेट आमदार सतेज पाटील यांच्या कसबाबावडा येथील घरी धडक मारली. मात्र आमदार पाटील पुण्यात असल्यामुळे त्यांनी राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते विश्‍वास नेजदार यांच्या घराकडे धाव घेतली. आणि गोकूळच्या निमित्ताने कोल्हापूरच्या राजकरणाला एक धक्काच दिला. 

कोल्हापूर - माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज सकाळी आठच्या सुमारास थेट आमदार सतेज पाटील यांच्या कसबाबावडा येथील घरी धडक मारली. मात्र आमदार पाटील पुण्यात असल्यामुळे त्यांनी राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते विश्‍वास नेजदार यांच्या घराकडे धाव घेतली. आणि गोकूळच्या निमित्ताने कोल्हापूरच्या राजकरणाला एक धक्काच दिला. 

कसबा बावड्यात महादेवराव महाडिक यांना फिरकू देणार नाही, असे आव्हान काल रात्रीच आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे डॉ.संदीप नेजदार यांनी पत्रकार परिषदेत दिले होते. विश्‍वास नेजदार यांना गोकूळच्या संपर्क सभेत झालेल्या मारहाणीनंतर डॉ. नेजदार यांनी थेट महाडिक यांना आव्हान दिले होते. मात्र आज सकाळी आठच्या सुमारास अचानकच महाडिक यांची गाडी थेट सतेज पाटील यांच्या घरी पोहचली. तेथे आमदार पाटील पुण्याला असल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्यांनी त्यांची मोटार थेट विश्‍वास नेजदार यांच्या घरी वळवली. काल ज्या माजी आमदारांना कसबा बावड्यात पाऊल ठेवू देणार नाही, असे आव्हान दिले होते तेच सकाळी दारात आल्याचे पाहून डॉ. नेजदार यांनाही आश्‍चर्य वाटले.

नेहमीच्या स्टाईलमध्ये महाडिक नेजदार यांच्या घरी पोहचले. तेथे त्यांनी घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे सांगितले. झाले हे चुकीचे असल्याची कबुली त्यांनी दिली. लोकशाही मार्गाने काम करू, असे सांगून कालच येणार होतो असेही स्पष्ट करून झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. महाडिक बावड्यात आल्याचे पाहून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी नेजदार यांच्या घरासमोर गर्दी केली. आणि सकाळपासूनच जिल्ह्याच्या राजकरणावर चर्चा सुरू झाली. 

21 सप्टेंबरला गोकूळची सर्वसाधारण सभा आहे. त्यामध्ये होणाऱ्या संघर्षाचे संकेत मिळत असल्यामुळेच महाडिक यांनी एक पाऊल माघारीचे शस्त्र वापरले की राजकरणातील त्यांचा हा मुत्सद्दीपणा आहे हे आता आगामी राजकरणात दिसून येईल. 

महादेवराव महाडिक घरी आले होते. त्यांनी विश्‍वास नेजदार यांना झालेल्या मारहाणीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. घडलेला प्रकार निंदणीय असल्याचे सांगितले. 

- डॉ.संदीप नेजदार

लोकशाही आहे, घडलेला प्रकार चुकीचा होता म्हणून सतेज पाटील यांच्या घरी गेलो होतो. पण ते पुण्याला असल्यामुळे नेजदारांच्या घरी जावून निंदनीय प्रकार झाल्याचे सांगितले आहे. कार्यकर्त्यांना समज दिली जाईल, असेही सांगितले आहे. 

- महादेवराव महाडिक 

Web Title: Mahadevrao Mahadik visit to Banti Patil House