‘महांकाली’ च्या अध्यक्षपदी पुन्हा सगरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अनिता सगरे, उपाध्यक्षपदी दिपकराव ओलेकर यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित संचालकांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित परमणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.

कवठेमहांकाळ - श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अनिता सगरे, उपाध्यक्षपदी दिपकराव ओलेकर यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित संचालकांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित परमणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.

पंचवार्षिक निवडणूकीत श्रीमती अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखाली महांकाली पॅनेलने सर्व जागा जिंकत कारखान्यावर सत्ता अबाधित राखली. गुरूवारी (ता. २२) अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम झाला.

अध्यक्षपदासाठी श्रीमती सगरे व उपाध्यक्षपदासाठी ओलेकर यांचेच अर्ज दाखल झाले. त्यांची निवड बिनविरोध झाली. नूतन पदाधिकारी, संचालकांनी लोकनेते नानासाहेब सगरे, स्व. विजयराव सगरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. 
श्रीमती सगरे म्हणाल्या,‘‘महांकालीवर सभासदांचा विश्वास आहे. तो सार्थ ठरवत कारखाना आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
नवनिर्वाचीत संचालक, कार्यकारी संचालक मनोज सगरे, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahakali Sugar Factory Chairman Anita Sagare Selection