महालक्ष्मीच्या साक्षीने सामाजिक एकोप्याचा संदेश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

कोल्हापूर - साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या श्री महालक्ष्मीच्या साक्षीने आज तीन हजारांवर महिलांनी कुंकुमार्चन उपासना करताना सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टने आयोजित केलेल्या या उपासनेत कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, मुंबई, रत्नागिरी, बेळगाव आदी परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. दरम्यान, सर्व जाती-धर्मांतील सुवासिनी महिलांनी या उपासनेत सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टने केले होते. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

अन्नछत्र सेवा ट्रस्टचा दहावा वर्धापन दिन, कन्यागत पुण्यपर्वकाळ आणि श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची मूळ जागी स्थापना होऊन तीनशे एक वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या सौभाग्य-सौख्यदायी उपासनेचे आयोजन झाले. महापौर हसीना फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराच्या पूर्व दरवाजा परिसरात सकाळी सात वाजता उपासनेला प्रारंभ झाला. त्यांच्यासह माजी महापौर अश्‍विनी रामाणे, रूपाली नांगरे-पाटील आदी उपासनेत सहभागी झाल्या. उपासनेसाठी आवश्‍यक सर्व साहित्य व भेटवस्तू महिलांना ट्रस्टतर्फे देण्यात आल्या. वेदमूर्ती सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपासना झाली. ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी, संजय जोशी, राजेश सुगंधी, तन्मय मेवेकरी आदींसह ट्रस्टच्या संचालकांनी या सोहळ्याचे नेटके संयोजन केले.

Web Title: Mahalakshmi witnesses largely social message