महालक्ष्मीची शैलपुत्रीमाता रूपात पूजा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गर्दीचा ओघ आजही कायम राहिला. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज देवीची श्री शैलपुत्रीमाता रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असून उद्या (ता. 4) मंगळवार असल्याने गर्दी आणखी वाढणार आहे. दरम्यान, तुळजाभवानी मंदिरात देवीची अश्‍वारूढ सालंकृत पूजा बांधण्यात आली. 

आमंत्रण नसताना शिवपत्नी सती दक्ष प्रजापतीच्या महायज्ञामध्ये गेली होती. तेथे शिवाचा अपमान झाल्यामुळे यज्ञकुंडामध्ये सतीने देहत्याग केला. हे समजल्यानंतर शिवाने वीरभद्रादि शिवगण यांना दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी पाठवले. या गणाने दक्ष यज्ञाचा विध्वंस केला. त्यानंतर देवीने पर्वतराज हिमवंताच्या पोटी शैलपुत्री (पार्वती) नावाने जन्म घेतला. पूर्वजन्मसंचितानुसार याही जन्मी तिचा विवाह शिवाशीच झाला. ही नवदुर्गातील व नवरात्र व्रतामधील प्रथम देवता असल्याची माहिती श्रीपूजक दिवाकर ठाणेकर, नीलेश ठाणेकर, सचिन ठाणेकर, श्रीनिवास जोशी यांनी दिली. 

महालक्ष्मी मंदिरात आज दिवसभरात विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांनी दर्शन घेतले. रात्री पालखी सोहळा झाला. सहनिबंधक (सहकारी संस्था) धनंजय डोईफोडे, जिल्हा निबंधक अरुण काकडे, मनोहर माळी, तहसीलदार वैशाली राजमाने आदींच्या हस्ते पालखीपूजन झाले. देवस्थान समितीचे सदस्य प्रमोद पाटील, संगीता खाडे आदी उपस्थित होते. 
 
वैद्यकीय सुविधा 
जिल्हा प्रशासन, महापालिका, व्हाईट आर्मी, ऍस्टर आधार, ऍपल सरस्वती हॉस्पिटल आदी संस्थांच्या पुढाकाराने मंदिर परिसरात वैद्यकीय कक्ष उभारले आहेत. यापूर्वी मंदिराच्या परिसरात सर्व संस्थांचे स्वतंत्र कक्ष असायचे. पण, यंदा सर्वांनी मिळून मंदिराच्या आवारात आणि जुना राजवाडा पोलिस स्टेशन शेजारी असे दोनच कक्ष उभारले असून तेथे सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत चक्कर आलेल्या दोन रुग्णांवर येथे उपचार झाले असून त्यात पुण्यातील एक आणि रूकडी येथील एका भाविकाचा समावेश आहे. वैद्यकीय कक्षात प्राथमिक उपचार करून आवश्‍यकता वाटल्यास सीपीआरमध्ये अशा रुग्णांना दाखल केले जात आहे.

Web Title: mahalaxmi pooja in shailputrimata

टॅग्स