'तीर्थक्षेत्र विकास आराखडा आठवड्यात'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

कोल्हापूर - तांत्रिक समितीकडून छाननी करून घेतलेल्या महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आरखडा आठवड्यात शासनाकडे पाठविला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आरखड्यासाठी 255 कोटींचा आराखडा केला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 72 कोटींचा आराखडा मंजूर होता. हा प्रस्ताव शासनाला पाठविण्याआधी त्याची तांत्रिक छाननी करून घेण्यात येणार आहे. याबाबत श्री. चोक्कलिंगम म्हणाले, ""पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून याची तांत्रिक छाननी करून प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल.'' 

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा देताना तो दोन टप्प्यांत देण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्याचा 72 कोटींचा प्रस्ताव तयार होता. या पहिल्या टप्प्यातील आराखड्याचे हरकती, सादरीकरण तसेच सर्वसामान्य लोकांच्या सूचना घेऊन आराखडा अंतिम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. 

पहिल्या टप्प्यात पार्किंग, दर्शन मंडप व भक्तनिवासाची काम केली जाणार आहेत. यापूर्वी सादर केलेल्या आराखड्यानुसार टेंबलाईवाडी येथे भक्तनिवास उभारण्यात येणार होते; मात्र हे भक्तनिवास भाविकांसाठी फायदेशीर ठरणार नसल्याने अंतिम करण्यात आलेल्या आराखड्यानुसार टेंबलाईवाडीऐवजी व्हीनस कॉर्नर येथे भक्तनिवास बांधण्यात येणार आहे. दरम्यान, या सर्व कामांबाबत तांत्रिक छाननी केली आहे. त्याचा प्रस्ताव आठवड्यात शासानाला दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

हरकतींवर अभ्यासासाठी समिती 
शहर हद्दवाढीऐवजी प्राधिकरण स्थापन करताना 125 हरकती आल्या आहेत. यामध्ये 10 हरकती महत्त्वाच्या आहेत. यावर अभ्यास करण्यासाठी नगररचना विभागाचे संचालक खान, सदाशिव साळुंखे व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती याबाबतच्या शंकांचे निरसन करतील तसेच हकरतीदारांना याची माहितीही देणार असल्याचे श्री. 
चोक्कलिंगम यांनी सांगितले. 

Web Title: mahalaxmi temple development plan