महामंडळासाठी अनेकांचे देव पाण्यात!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सातारा - विविध दहा महामंडळांच्या नियुक्‍त्या २५ एप्रिलपासून होण्याचे संकेत आहेत. त्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांना गळ घालण्यास सुरवात केली आहे. एखाद्या महामंडळावर स्थान मिळेल या आशेने सातारा जिल्ह्यातील भाजपचे काही नेते मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. 

सातारा - विविध दहा महामंडळांच्या नियुक्‍त्या २५ एप्रिलपासून होण्याचे संकेत आहेत. त्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांना गळ घालण्यास सुरवात केली आहे. एखाद्या महामंडळावर स्थान मिळेल या आशेने सातारा जिल्ह्यातील भाजपचे काही नेते मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. 

विविध दहा महामंडळाच्या नियुक्‍त्या पुढील आठवडाभरात होण्याचे संकेत आहेत. त्यासाठी भाजपअंतर्गत हालचाली गतिमान झालेल्या असून, भारतीय जनता पक्षातील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी महामंडळावर आपल्याला संधी मिळावी, या आशेने मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांशी संपर्क करून गळ घालण्यास सुरवात केलेली आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर जिल्ह्याला दोन महत्त्वाची पदे मिळाली. त्यात शेखर चरेगावकर यांना सहकार परिषदेचे अध्यक्षपद आणि अतुल भोसले यांना विठ्ठल- रुक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्षपद देण्यात आले; पण भाजपमधील जुने, जाणते पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अपेक्षा असूनही काहीही मिळालेले नाही. या जुन्या पदाधिकाऱ्यांत माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी जिल्हाध्यक्ष भारत पाटील, दत्ताजी थोरात, सुहास गानू आदींचा समावेश आहे; पण महामंडळाच्या या निवडीबाबत या जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले जात आहे, तरीही काही नव्याने भाजपमध्ये गेलेल्यांनी मात्र, महामंडळासाठी गळ घालण्यास सुरवात केली आहे. काहींनी तर थेट मुंबईत ठाण मांडले आहे.

बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी 
दरम्यान, ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सातारा जिल्ह्याकडे भाजपच्या सर्व नेत्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महामंडळावर साताऱ्यातून कोणाची वर्णी लागणार याचे औत्सुक्‍य आहे. 

Web Title: mahamandal selection politics