Maratha Kranti Morcha : पारगाव-खंडाळा येथे ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

खंडाळा : मराठा आरक्षणासंदर्भात आज सकाळी अकरा वाजता पुणे-बंगळूर महामार्गावरील पारगाव येथे अचानक नियोजित मोर्चा महामार्गाकडे वळविण्यात आला. यावेळी काहीकाळ पुणे-बंगळूर महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यानंतर हा मोर्चा मोठ्या घोषणाबाजी करत शहराच्या मुख्य रस्त्याने तहसील कचेरीकडे रवाना झाला.

मराठा आरक्षण या प्रमुख मागणीसाठी आज बहुसंख्येने मराठा बांधव पारगाव येथे एकञ येऊन मोर्चात सहभागी झाले. यावेळी हजारो मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले. यामुळे हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला.

परिसरातील गावातील मराठा बांधव ही सामील झाले. भगवे झेंडे घेऊन मोर्चात 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे ' व 'एक मराठा, लाख मराठा' अशा  घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चावेळी पंचायत समिती परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण व स्मारकास युवतींच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले गेले.

तसेच पुढे शिवाजी चौकातही छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला गेला. तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासही पुष्पहार घालण्यात आला. यानंतर मोर्चेकरांच्या वतीने तहसीलदार कचेरी समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा युवती,लहान मुले,पदाधिकाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. यावेळी कै. काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

सर्व मराठा बांधवांनी आपल्या हातात हात देऊन मराठ्याची वज्रमूठ दाखवून जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच युवतींची भाषणे ही झाली. तहसीलदार यांना निवेदन तीन वाजता देण्यात येणार आहे. यावेळी खंडाळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. तसेच पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. दंगानियंञक पथकला ही पाचारण करण्यात आले होते.

गेले सात दिवसांपासून धनगर आरक्षण संदर्भात धरणे आंदोलन तहसील कचेरीसमोर सुरु आहे. ज्यावेळी मराठा मोर्चा हा तहसील कार्यालयासमोर आला. त्यावेळी धनगर आरक्षणासाठी आंदोलनास बसलेल्या कृती समितीचे कार्यकर्ते ही या मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनात येऊन बसले. तत्पूर्वी मराठा युवती व लहान मुलींच्या हस्ते धनगर आरक्षण आंदोलनस्थळी असणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास ही पुष्पहार अर्पण करण्यात आले.

Web Title: Maharashtra Bandh Maratha Kranti Morcha Peoples on Agitation