महाराष्ट्र एक्सप्रेस 19 एप्रिलपर्यंत रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

मिरज - कोल्हापूर ते गोंदिया आणि गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महाराष्ट्र एक्‍सप्रेसला शुक्रवारपासून (ता. 5) ते 19 एप्रिल (शुक्रवार) पर्यंत रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे ते भुसावळ आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर सुरू असलेल्या विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाच्या कामासाठी महाराष्ट्र एक्‍सप्रेस या 19 एप्रिल पर्यंतच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. 5 एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता गोंदियाकडे जाणारी महाराष्ट्र एक्‍सप्रेस 18 एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आली आहे तर गोंदियाहून कोल्हापूरला येणारी महाराष्ट्र एक्‍सप्रेस सहा एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान बंद राहणार आहे. याच गाडीशी संलग्न असलेली सह्याद्री एक्‍स्प्रेस ही गाडी मात्र नियमितपणे धावणार आहे. असेही मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. 

Web Title: Maharashtra Express cancelled upto 19 April