उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावास मंजुरी

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 16 एप्रिल 2018

सोलापूर : अमृत योजनेंतर्गत उजनी ते सोलापूरदरम्यान समांतर जलवाहिनी टाकण्याच्या 439 कोटी रुपयांच्या आराखड्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 
त्यापैकी 150 कोटी रुपयांचे अनुदान अमृत योजनेंतर्गत मिळणार असून, राज्य व महापालिकेचा हिस्सा प्रत्येकी 75 कोटींचा असेल. उर्वरीत 139 कोटी रुपये
एनटीपीसीकडून घेतले जाणार आहेत. 

सोलापूर : अमृत योजनेंतर्गत उजनी ते सोलापूरदरम्यान समांतर जलवाहिनी टाकण्याच्या 439 कोटी रुपयांच्या आराखड्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 
त्यापैकी 150 कोटी रुपयांचे अनुदान अमृत योजनेंतर्गत मिळणार असून, राज्य व महापालिकेचा हिस्सा प्रत्येकी 75 कोटींचा असेल. उर्वरीत 139 कोटी रुपये
एनटीपीसीकडून घेतले जाणार आहेत. 

केंद्र शासनाने अमृत योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्याने सादर केलेल्या 3280 कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यामध्ये उजनी ते सोलापूरदरम्यानच्या
समांतर जलवाहिनीचा समावेश आहे. त्यास मंजुरी देण्यात आली. या योजनेवर महापालिकेचे नियंत्रण असणार आहे. एनटीपीसीकडून 139 कोटी रुपये उपलब्ध करून
घेतले जाणार आहेत. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर शहराच्या पाणीपुरवठ्यात लक्षणीय सुधारणा होणार आहे. हा प्रकल्प मंजूर केल्यानंतर कोणत्याही कारणाने त्याची किंमत वाढल्यास त्याची जबाबदारी महापालिकेवर असणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून कोणतेही वाढीव अनुदान मिळणार नाही. 

सध्या सोलापूर शहराला उजनी ते सोलापूर, टाकळी-सोरेगाव आणि हिप्परगा या तीन ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो. समांतर जलवाहिनी सुरु झाल्यावर टाकळी योजनेवरील भार कमी होणार आहे. ही योजना सुरू झाल्यावर टाकळी योजना सुरु ठेवायची की बंद करायची याचाही निर्णय महापालिका प्रशासनास घ्यावा लागणार आहे. शासकीय योजना मंजूर झाली की ती वेळेत पूर्ण न करण्याची परंपरा सोलापूर महापालिकेची आहे. तसाच प्रकार या योजनेबाबत होऊ नये याची दक्षता महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांनी घेणे आवश्यक आहे. ड्रेनेज योजनेसारखी ही योजनाही रखडणार नाही यासाठी तातडीने या योजनेचे प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असणार आहे.

Web Title: maharashtra government approves scheme for ujani to solapur parallel pipe line