सीमाप्रश्‍नी शरद पवार यांची वकिलांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

कोल्हापूर - आठवड्यात दुसऱ्यांदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची दिवसभर विविध शिष्टमंडळांनी भेट घेतली. यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्‍नाचा खटला पुन्हा पटलावर यावा, यासाठी खासदार पवार यांनी या खटल्यातील वकील शिवाजीराव जाधव यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातून आलेल्या विविध शिष्टमंडळांनीही पवारांना निवेदने सादर केली.

खासदार पवार शनिवारी (ता. १) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. उद्या (ता. २) ते आंबोली येथे उसाला बीटचा पर्याय, यासंबंधी होणाऱ्या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार असल्याने शनिवारीच ते कोल्हापुरात दाखल झाले आहेत. 

महाराष्ट्र एकीकरण समितीने गत आठवड्यात खासदार पवार यांची भेट घेत सर्वोच्च न्यायालयातील खटला पटलावर घेण्यासाठी वकिलांशी भेट घालून देण्याची विनंती केली. आज पुन्हा या शिष्टमंडळाने हीच मागणी केली. यावर खासदार पवार यांनी या खटल्यातील वकील शिवाजीराव जाधव यांना फोन करून यासंबंधी बैठक आयोजन करण्याची सूचना केली. यावर जाधव यांनी याबाबत ॲड. हरिष साळवे यांच्याशी चर्चा करून वेळ कळवतो, असे सांगितले. ॲड. जाधव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पवार यांनी शिष्टमंडळाला लवकरच दिल्लीत बैठक घेण्याची ग्वाही दिली.

रात्रीचे जेवण न्यू पॅलेसवर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी दुपारी खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी स्नेहभोजन घेतले. रात्रीचे स्नेहभोजन श्रीमंत शाहू महाराज यांच्या न्यू पॅलेसवर घेतले. या वेळी खासदार पवार यांचे राजपरिवाराकडून स्वागत करण्यात आले.

Web Title: Maharashtra Karnataka border issue