महाराष्ट्र - कर्नाटकच्या होणार मंत्र्यांची मुंबईत बैठक; या कराराचा आहे विषय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

जत तालुक्‍यातील पूर्व भागातील वंचित गावांना कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्यासाठी आज कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री जारकीहोळ्ळी व महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यात महत्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे.

जत (जि . सांगली : जत तालुक्‍यातील पूर्व भागातील वंचित गावांना कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्यासाठी आज कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री जारकीहोळ्ळी व महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यात महत्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे.

अनेक वर्षांपासून आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तुबची योजनेसाठी पाठपुरावा केला. आजचा मुहूर्त साधला आहे. वंचित गावांच्या पाणी प्रश्नासाठी हा करार महत्वाचा आहे. 

या बैठकीसाठी आमदार विक्रमसिंह सावंत हेदेखील उपस्थित राहणार आहेत. आज सकाळीच ते मुंबईकडे रवाना झाल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी आमदार सावंत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन या तुबची बबलेश्वर पाण्यासाठी चर्चा केली होती. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर आजची बैठक ही पूर्व भागातील वंचित गावांसाठी महत्वाची ठरणार आहे. 

यापूर्वी सन 2015-16 व 2016-17 वर्षी महाराष्ट्राने चार टी. एम. सी. पाणी कर्नाटकला दिले होते. उन्हाळ्यात दिलेल्या पाण्यापोटी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान दुपटीने जतच्या पूर्वभागात पाणी देण्याचा करार करता येऊ शकेल. 

नैसर्गिक उताराने पाणी 

पिण्याचे पाणी, चारा टंचाई, यासह परिसरातील 13 हजार हेक्‍टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. प्राथमिक सर्व्हेनुसार ते पाणी वितरण हौद (तिकोटा) ते जत सीमेवर असलेले सर्व तलाव ग्रॅव्हिटीने भरून घेता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra-Karnataka ministers to meet in Mumbai