सांगलीमध्ये नाल्यात मगरीचा वावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सांगली - कृष्णा काठावरील मगरींचा वावर नित्याचाच आहे. मात्र, बायपास पुलाजवळील नाल्यात मगरीचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. या मगरीला सुरक्षितस्थळी नेण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. 

कृष्णा नदीत मगरींचा वावर पूर्वीपासूनच आहे. काही वर्षांत बेसुमार वाळू उपशामुळे मगरींचे अधिवास नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे मगरींचे नागरी वस्तीजवळ वारंवार दर्शन होत आहे. सध्या आयर्विन पुलाजवळ मगरीचे दर्शन नित्याचे बनले आहे; परंतु बायपास पुलाजवळील नाल्यात तीन दिवसांपासून मगरीचा वावर असल्याचे नागरिकांनी वनविभागाला कळवले. वनविभागाने त्या परिसरात मगर पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत. मगरीला पकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.

Web Title: maharashtra news sangli crocodile

टॅग्स