सोलापुरातील मंत्र्यांच्या घरी पोलिस संरक्षण

संतोष सिरसट
बुधवार, 7 जून 2017

कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित घठडू नये यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे यांच्यासह अन्य काही लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

सोलापूर - कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित घठडू नये यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे यांच्यासह अन्य काही लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, मालाला हमीभाव मिळावा, वीजबिल रद्द करावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या सात दिवसापासून हा संप सुरू आहे. संपाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. सोलापूर शहर पोलिसांनी शहरात असलेले सहकारमंत्री देशमुख, पालकमंत्री देशमुख, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासह संपर्क कार्यालयावर बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींच्याही घरी बंदोबस्त ठेवला आहे.

आमदार सोपल यांनी स्वतः: लावले कुलूप
शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाला आमदार दिलीप सोपल यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी स्वतः आपल्या कार्यालयाला कुलूप लावून संपाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शिवसेना आक्रमक; मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार
कर्जमाफीसाठी समितीत शिवसेनाही असेल: मुनगंटीवार
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे: सुभाष देसाई
संप मिटवायचा आहे की नाही?: संजय राऊत
पाकिस्तान होणार चीनचा लष्करी तळ; 'पेंटॅगॉन'चा अहवाल​
हिज्बुलचा दहशतवादी दानिश अहमदचे आत्मसमर्पण
'यूपीआय' व्यवहारांवर भरावे लागणार शुल्क
शेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण​
लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​

Web Title: maharashtra news solapur news police security marathi news farmer agiation