K-OK maharashtra news solapur news subhash deshmukh कारखान्यांच्या वजनकाट्यांची होणार तपासणी - सहकारमंत्री | eSakal

कारखान्यांच्या वजनकाट्यांची होणार तपासणी - सहकारमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

सोलापूर - यंदाच्या गाळप हंगामापासून एक विशेष पथक तयार करून अचानकपणे साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे साखर कारखान्यांनी सावध राहण्याचा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे. 

सोलापूर - यंदाच्या गाळप हंगामापासून एक विशेष पथक तयार करून अचानकपणे साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे साखर कारखान्यांनी सावध राहण्याचा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे. 

येथील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून त्यांच्या विभागाच्या माध्यमातूनही साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्यात येणार आहे. गाळप हंगामापूर्वी परवाना घेणे गरजेचे आहे. तो परवाना घेणे यंदाच्या वर्षापासून ऑनलाइन केले आहे. दरवर्षी परवाना घ्यावा लागू नये, यासाठी शिफारस करून ती केंद्र शासनाकडे पाठविली असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक जिल्हा बॅंका त्यांच्याकडे असलेल्या जुना नोटा घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना खरिपासाठी 10 हजार रुपये कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा बॅंकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हा बॅंकांकडे 10 लाख रुपयांची थकबाकी असलेल्या लोकांची यादी मोठी आहे. ती यादी तयार करून त्याचे प्रसिद्धीकरण बॅंकेच्या दारावर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या थकबाकीदारांकडून कर्जाची वसुली करून तेच कर्ज गोरगरीब शेतकऱ्यांना देण्याच्या सूचनाही बॅंकांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना खरिपासाठी 10 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतची स्थिती एक-दोन दिवसांत पूर्ववत होईल. बॅंकांकडून शेतकऱ्यांना ते पैसे दिले जातील. त्याला सरकारची हमी असेल.

Web Title: maharashtra news solapur news subhash deshmukh