आमचं ठरलंय; कोल्हापूर दक्षिणही जिंकलंय | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

कोल्हापूर : दक्षिण मतदारासंघात ऋतुराज पाटील 42 हजार 964 मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा पराभव केला. अमल महाडिक यांना मोजक्याच फेरीत माफक आघाडी मिळवता आली. त्यामुळं ऋतुराज पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. 2014 च्या निवडणुकीत काका आमदार सतेज पाटील यांच्या झालेल्या पराभवाचा ऋतुराज पाटील यांनी बदला घेतला. या निवडणुकीसाठी 21 ऑक्‍टोंबर रोजी चुरशीने 74 टक्के मतदान झाले होते. एकूण 3 लाख 24 हजार 367 मतदारांपैकी 2 लाख 41 हजार 964 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोल्हापूर : दक्षिण मतदारासंघात ऋतुराज पाटील 42 हजार 964 मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा पराभव केला. अमल महाडिक यांना मोजक्याच फेरीत माफक आघाडी मिळवता आली. त्यामुळं ऋतुराज पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. 2014 च्या निवडणुकीत काका आमदार सतेज पाटील यांच्या झालेल्या पराभवाचा ऋतुराज पाटील यांनी बदला घेतला. या निवडणुकीसाठी 21 ऑक्‍टोंबर रोजी चुरशीने 74 टक्के मतदान झाले होते. एकूण 3 लाख 24 हजार 367 मतदारांपैकी 2 लाख 41 हजार 964 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघाची मतमोजणी आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात राजाराम तलावाशेजारील शासकीय गोदामात झाली.

देवेंद्रजी इथे आहे सक्षम विरोधीपक्ष

पावसातील एका सभेने बदलले राजकारण

फेरीनिहाय वाढत गेलेली आघाडी

 1. पहिली फेरी - 3802
 2. दुसरी - 6159
 3. तिसरी - 8788
 4. चौथी -  10923
 5. पाचवी - 14180 
 6. सहावी - 17983
 7. दहावी - 26825
 8. अकरावी -  28563 
 9. बारावी -   30216
 10. तेरावी -  32764
 11. चौदावी - 34843
 12. पंधरावी - 38591 
 13. सोळावी -  42553  

अशी झाली निवडणूक
कोल्हापुरात लोकसभा निवडणूकीपासूनच महाडिक यांना आमदार सतेज पाटील यांनी आव्हान दिले होते. आमचं ठरलयं असा नारा देत माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात उघड मोहीम सुरू केली होती. विधानपरिषदेचे आमदार असल्यामुळे त्यांना दक्षिण मतदार संघातून उभे राहण्यास काँग्रेस पक्षाने नकार दिला. त्यामुळे त्यांनी त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना या निवडणुकीत दक्षिणमधून उतरवले. 'आमच ठरलंय आता दक्षिण उरलयं' म्हणत निवडणुकीत महाडिक यांच्या विरोधात राण पेटवले. या निवडणुकीत भाजपने गृहमंत्री अमित शहा यांची सभा घेतली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची युवकांची सभा घेतली. काँग्रेसने मात्र युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी ज्योतिरादित्य शिदे यांना आणले होते. पण, महायुतीतील अंतर्गत लाथाळ्यांमुळेच कोल्हापूर दक्षिणमधून विद्यमान आमदार अमल महाडीक यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी निवडणुकीपूर्वी उघडपणे सतेज पाटील यांच्या संवाद मेळाव्यात उपस्थित राहून आपली भुमिका उघड केली होती. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहिरपणे मंडलिक यांच्यावर टीकाही केली होती. पण शिवसेना आणि भाजपच्या या अंतर्गत लाथाळ्यांनी भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे. 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Kolhapur South final result Congress Ruturaj Patil won