अकोले : किरण लहामटे यांचा विजय; पिचडांच्या गडाला सुरुंग | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी  भाजपचे वैभव पिचड यांचा पराभव केला आहे. तव्बल सातवेळेस मधुकरराव पिचड आमदार हाेते, त्यानंतर वैभव पिचड आमदार हाेते. यावेळेस त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. 

अकोले : अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी भाजपचे वैभव पिचड यांचा पराभव केला आहे. तव्बल सातवेळेस मधुकरराव पिचड आमदार हाेते, त्यानंतर वैभव पिचड आमदार हाेते. यावेळेस त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. 

दरम्यान, गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीअखेर माजी आमदार वैभव पिचड २ हजार ९७२ तर डॉ. किरण लहामटे  ४  हजार २५२ मते पडली. त्यानंतर प्रत्येक फेरीगणिक लहामटे यांना मतांची अघाडी मिळत गेली.    

दरम्यान, आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ च्या निवडणुकीत वैभव पिचड पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार तत्पुर्वी वडील माजी मंत्री मधुकर पिचड सातवेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते. मधुकर पिचड चार वेळा काँग्रेसकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Nagar akole final result ncp kiran lahamte won