पारनेर : राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी मारले मैदान | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का देत राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके विजय़ी झाले आहेत. 

पारनेर : पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का देत राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके विजय़ी झाले आहेत. 

त्यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली आहे लंके यांची जेसीबीवरुन मिरवणूक काढण्यात आली आहे़. पारनेर विधानसभा निवडणुकीत २ लाख ५ हजार मतदान झाले होते़ त्यापैकी सुमारे १ लाख ८० हजार मतमोजणी झाली असून, त्यापैकी १ लाख ९ हजार मते लंके यांना मिळाली आहेत़. पारनेर मतदारसंघात लंके यांना मिळालेली ही मते आत्तापर्यंतची सर्वाधिक मते असल्याचे सांगण्यात येते़  औटी यांना ६४ हजार मते मिळाली आहेत़.

लंके यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची जेसीबीवरुन मिरवणूक काढली़. कार्यकर्त्यांनी लंके यांच्या नावाच्या जोरदार घोषणा देत गुलालाची उधळण केली़ औटी हे सलग तीन वेळा पारनेरमधून निवडून आले़. निवडणूक निकालाच्या कल पाहता औटी यांची विजयी घोडदौड रोखण्यात लंके यांना यश आल्याचे दिसते़. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Nagar parner final result ncp Rohit Pawar won

टॅग्स
टॉपिकस