कागल : हसन मुश्रीफ आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

कागलची निवडणूक पहिल्यांदाच विकासाच्या मुद्यावर लढवली गेली आहे. व्यक्तीगत आरोप-प्रत्यारोप टाळले गेले आहेत. आमदार हसन मुश्रीफांनी आक्रमक टीका-टिप्पणी टाळत केलेली कामे, काय करणार यावरच भर दिला

कागल - येथील विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या चाैथ्या फेरीत राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे 463 मतांनी आघाडीवर आहेत. 

चाैथ्या फेरीत हसन मुश्रीफ यांना 20495 मते तर अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना 20032 मते मिळाली आहेत. बसपचे रविंद्र कांबळे यांना 97, शिवसेनेचे संजय घाटगे यांना 3600, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार सिध्दार्थ नागरत्न यांना 117 तर श्रीपती कांबळे यांना 134 मते मिळाली आहेत. 

कागलची निवडणूक पहिल्यांदाच विकासाच्या मुद्यावर लढवली गेली आहे. व्यक्तीगत आरोप-प्रत्यारोप टाळले गेले आहेत. आमदार हसन मुश्रीफांनी आक्रमक टीका-टिप्पणी टाळत केलेली कामे, काय करणार यावरच भर दिला. संजय घाटगे यांनी निवडणूक दिल्यास प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.  

समरजित घाटगे यांनी विकासाचे रोड मॉडेल मतदारांसमोर ठेवले आहे. जातीय समीकरणांना अजिबात थारा नाही. त्यामुळेच अल्पसंख्याक असणारे मुश्रीफ कामाच्या जोरावार गेली वीस वर्षे आमदार आहेत. प्रमुख तीन उमेदवारांनी चिकोत्रा खोऱ्यातील प्रकल्प, कागल एमआयडीत नवीन उद्योगधंद्ये, रोजगार, महिलांना स्वावलंबीबनविण्यासाठी नवनवीन उद्योग आणणे तसेच  मुश्रीफ आणि संजय घाटगे यांनी जाहीर केलेली ही शेवटची निवडणूक हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरले. समरजितसिंह घाटगे, आमदार हसन मुश्रीफ व संजयबाबा घाटगे यांनीसोशल मीडियाचा पुरेपुर वापर केला.

कागल तालुक्‍यात दोन लाख वीस हजार तर गडहिंग्लज उत्तूर भागात एक लाख मते असून, ती निर्णायक आहेत. गतवेळच्या निवडणुकीत उमेश आपटे, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचा गट, तसेच रणजित पाटील यांनी मुश्रीफांना पाठिंबा दिला होता. यावेळी ते त्यांच्यासोबत नाहीत; पण श्रीपतराव शिंदे त्यांच्यासोबत आहेत. आपटे यावेळी संजय घाटगे यांच्यासोबत, तर प्रकाश शहापूरकर, रणजित पाटील, बाबासाहेब पाटील समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत आहेत. विकासाच्या मुद्यावर लढलेल्या निवडणुकीतील त्रिकोण कोण भेदणार? हे पहावे लागेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Kolhapur Kagal trends first phase