कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर दक्षिण फेरीनिहाय मोजणी होणार आहे. यामध्ये एकूण १७ फेऱ्या होणार आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये  
एकूण टपाली मते 1850 आहेत.

कोल्हापूर - येथील दक्षिण मतदारसंघात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली.पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांना आघाडी मिळाली आहे. 

दरम्यान या मतदारसंघात एकूण १७ फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीत भाजपचे अमल महाडिक यांना 6040 मते तर काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांना 9842 मते मिळाली आहेत. 

दरम्यान, कोल्हापूर दक्षिण फेरीनिहाय मोजणी होणार आहे. यामध्ये एकूण १७ फेऱ्या होणार आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये  
एकूण टपाली मते 1850 आहेत. यामध्ये सैनिक मते 94 तर
टपाल 1756 मते इतकी आहेत. भाजपतर्फे अमल महाडिक तर काँग्रेसतर्फे ऋतुराज पाटील यांच्यात काटेकी टक्कर होत आहे. 

कोल्हापूर दक्षिणमध्ये पारंपरिक विरोधकांच्या लढतीतील प्रचारात विकासापेक्षा वैयक्तिक टीकाटिप्पणीवर भर दिला गेला. आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात थेट बोलण्याचा मुद्दा नसल्याने त्यांचे वडील माजी आमदार महादेवराव महाडिक, चुलत भाऊ व माजी खासदार धनंजय महाडिक हेच टीकेचे लक्ष्य झाले. महाडिक यांच्याकडूनही काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज यांच्यावर टीका करण्यासाठी विषय नसल्याने त्यांनीही त्यांचे चुलते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनाच ‘टार्गेट’ केले गेले.

लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी आघाडी धर्माला तिलांजली देत माजी खासदार महाडिक यांच्या पराभवासाठी कंबर कसली. त्यामुळे अलीकडे हा संघर्ष वैयक्तिक पातळीवर पोचला. अशा पार्श्‍वभूमीवर या लढतीत दोन्ही बाजूंचे उमेदवार राहिले बाजूला, त्यांच्या नातेवाइकांतच जुंपली. धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश आणि तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून भाजपवरच झालेल्या टीकेचा व्हिडिओ विरोधकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाडिक यांच्याकडून लोकसभा निवडणुकीतील आमदार पाटील यांच्या भूमिकेचा पर्दाफाश केला गेला.

मराठा समाजाचे प्राबल्य या मतदारसंघात आहे. त्यात महापालिकेतील १७ प्रभाग या मतदारसंघात येतात. दोन्हीही उमेदवार मराठा समाजाचे आहेत. दोघांची ताकद तुल्यबळ आहे. काँग्रेसने महाडिक यांच्या गटातील काहींना फोडून त्यांचा पाठिंबा मिळवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाडिक यांनीही अनेक वर्षे पाटील यांच्या पाठीशी असलेल्यांना आपल्या बाजूने वळवले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Kolhapur South trends early morning