माण : भाजपचे जयकुमार गोरे आघाडीवर I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर श्रीपालवण बुथ क्रमांक 1 पासून सुरुवात करुन चितळी बुथ क्रमांक 359 शेवटी मोजण्यात आली. मतमोजणीच्या एकून 26 फेऱ्या होणार आहेत.

दहिवडी (ता. माण) : सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची मानली जात असलेल्या माण विधानसभा मतमोजणीचे निकाल हाती आले आहेत. आठव्या फेरीअखेर भाजपच्या जयकुमार गोरेंना 32105 मते मिळाली असून अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना 25401 मते मिळाली आहेत. तर शेखर गोरे यांना 13552 एवढी मते मिळाली आहेत. 

माण विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुरू असून दुपारी दीड वाजता निकाल हाती येईल. सकाळी साडेआठ वाजता नवीन शासकीय धान्य गोदामात प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. एकूण चौदा टेबलवर मतमोजणी करण्यात आली.

सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर श्रीपालवण बुथ क्रमांक 1 पासून सुरुवात करुन चितळी बुथ क्रमांक 359 शेवटी मोजण्यात आली. मतमोजणीच्या एकून 26 फेऱ्या होणार आहेत.

माण विधानसभा मतदारसंघाविषयी :

- एकूण मतदार : 3,40,211
- झालेले मतदान : 225735
- पुरुष मतदार : 117066
- महिला मतदार : 108669
- इतर मतदार :  0
- एकूण मतदान टक्केवारी : 66.35 %


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Maan trends morning