मतमोजणी माढ्याची तर चर्चा करमाळ्याची : Election Result 2019

VidhanSabha2019-Madha
VidhanSabha2019-Madha

कुर्डू (जि. सोलापूर) : महाराष्ट्र विधानसभा मतमोजणी सध्या जोरात सुरु असुन प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघाचा निकाल जाणून घेण्यात व्यस्त आहेत. मात्र, माढा तालुक्यातील जनता याला अपवाद आहे. मतमोजणी माढा तालुक्याची आणि चौकशी करमाळा विधानसभेची करत असून माढ्यापेक्षा करमाळा विधानसभेच्या निकालाची उत्सुकता लागली आहे.

सोलापुर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि करमाळ्यातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माढा तालुक्यातील छत्तीस गावे करमाळा विधानसभेला जोडली असून निमगावचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे दोन भाऊ विधानसभेच्या रिंगणात आहेत.

बबनराव शिंदे हे प्रत्येक फेरीत मतांची आघाडी घेत आहेत. यामुळे येथील कार्यकर्ते माढ्याचा विजय ग्रहीत असून संजय शिंदे उभा असलेल्या करमाळा विधानसभेच्या  मतमोजणीची सतत चौकशी करुन एकाच घरातील दोन आमदा होणार यावर पैजा लावल्या जात आहेत. समर्थकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या पैजा कोण जिंकणार? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सतराव्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या बबनराव शिंदेंना एक लाख 420 मते, तर शिवसेनेच्या संजय कोकाटेंना 52,722 मते मिळाली आहेत. शिंदेकडे 47698 मतांची आघाडी असून ते विजयी झाल्यात जमा आहेत. 

तर बार्शी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांना २५,७२८ मते, दिलीप सोपल यांना २५,६०६ मते मिळाली असून राऊत १२२ मतांनी आघाडीवर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com