माढा : बबनराव शिंदे सलग सहाव्यांदा विजयी; औपचारिकता बाकी I Election Result 2019

अशोक मुरुमकर
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

बार्शीत अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत हे पिछाडीवर गेले आहेत. तर शिवसेनेचे दिलीप सोपल व सांगोल्यातून शहाजीबापू पाटील हे आघाडीवर आहेत.

सोलापूर : माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. त्यांना 67 हजार 743 मते मिळाली आहेत. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस गड राखण्याची चिन्हे आहेत.

पंढरपूर, माढा, माळशिरस व मोहोळ या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर शहर उत्तर, शहर दक्षिण व अक्कलकोटमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. करमाळ्यात शिवसेनेचे बंडखोर नारायण पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. ते सुमारे 11 हजार मताने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे व शिवसेनेच्या रश्‍मी बागल यांच्या पुढे आहेत.

- कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे मतमोजणी केंद्रातून बाहेर

बार्शीत अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत हे पिछाडीवर गेले आहेत. तर शिवसेनेचे दिलीप सोपल व सांगोल्यातून शहाजीबापू पाटील हे आघाडीवर आहेत. शहर मध्यमध्ये शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश कोठे हे पिछाडीवर पडले असून कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे या मध्य मधून आघाडीवर आल्या आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथून राष्ट्रवादीचे भारत भालके, माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर, मोहोळमध्ये यशवंत माने, उत्तरमधून मनोहर सपाटे, बार्शीतून निरंजन भूमकर व माढ्यात बबनराव शिंदे हे उमेदवार रिंगणात आहेत. तर अक्कलकोटमध्ये कॉंग्रेसकडून सिद्धाराम म्हेत्रे व शहर मध्यमधून प्रणिती शिंदे, दक्षिणमधून बाबा मिस्त्री हे रिंगणात आहेत.

- सोलापूर : सोलापुरात यांनी राखली आघाडी I Election Result 2019

भाजपकडून माळशिरसमध्ये राम सातपुते, अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी, दक्षिणमधून सुभाष देशमुख, पंढरपूरमधून सुधाकर परिचारक व उत्तरमधून विजयकुमार देशमुख रिंगणात आहेत. शिवसेनेकडून करमाळ्यातून रश्‍मी बागल, सांगोल्यातून शहाजीबापू पाटील, मोहोळमध्ये नागनाथ क्षीरसागर, बार्शी दिलीप सोपल, मध्य मध्ये दिलीप माने या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. त्यात दिलीप चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. शहर मध्य मध्ये एमआयएमचे फारुक शाब्दी यांनी पहिल्या फेरीमध्ये जोरदार आघाडी घेतली मात्र. पुन्हा ते मागे पडले.

जिल्ह्यातील काही मतदार संघामध्ये चुरशीचा सामना असून प्रत्येक फेरीत आकडेवारी बदलत आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे अद्याप सांगता येत नसले तरी राष्ट्रवादी जिल्ह्यात गड राखेल असे चित्र आहे. 12.30 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत मागे पडलेल्या कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे 11 हजार मतांनी आघाडीवर आल्या आहेत. तर माळशीरसमध्ये आघाडीवर असलेले जानकर यांचे मताधिक्‍य कमी होऊन 11 हजार 115 झाले.

- शरद पवारांची पत्रकार परिषद; 'या' घोषणांची शक्यता

करमाळ्यातील नारायण पाटील हे पुढे गेले आहेत. दिलीप सोपल हेही काही फेऱ्यात मागे पडले होते. मात्र राऊत यांना मागे टाकत ते पुढे आले आहेत. सहकारमत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. माढ्यातून बबनराव शिंदे हे आघाडीवर आहेत. प्रत्येक फेऱ्यांमध्ये चित्र बदलत असल्याने अद्याप विजय कोणाचा हे निश्‍चित नसले तरी जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जलसंधारणमंत्री तानाजीराव सावंत यांनी दिलेले उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. सोलापूरातील मध्य मतदार सघात दिलीप माने हे कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेले होते. ते सध्या पिछाडीवर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Madha trends afternoon