करवीर : काँग्रेसचे पी. एन. पाटील आघाडीवर | Election Results 2019

करवीर : काँग्रेसचे पी. एन. पाटील आघाडीवर | Election Results 2019

कोल्हापूर - करवीर मतदार संघातून नव्या फेरीअखेर काँग्रेसचे पी. एन. पाटील यांना 3480 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे चंद्रदीप नरके आहेत. 

करवीरची मतमोजणी कसबा बावडा येथील रमणमळा शासकिय गोदामात सकाळी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणी 18 फेऱ्यात होणार आहे. जिल्हात एकूणच आघाडीला चांगले मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम याही मतदार संघात पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, सलग दोन वेळा पराभव स्वीकारलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील व शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांच्यात प्रतिष्ठेची लढत येथे पाहालया मिळेत आहे. उमेदवारांपेक्षा ते नेतृत्व करत असलेले साखर कारखाने आणि गोकुळ दूध संघ हाच प्रचाराचा मुद्दा या निवडणूकीत राहिला. नरके यांनी साखर कारखाना आणि अन्य निवडणुकीत यापूर्वी दिलेला ‘शब्द’ न पाळल्याने त्यांच्या अनेक बिनीच्या 
शिलेदारांनी पी. एन. यांना पाठिंबा जाहीर केला. नरके यांनी केलेल्या विकासकामांच्या निकृष्ट दर्जावरही पी. एन. यांच्याकडून तीव्र टीका झाली.

नरके हे ‘कुंभी’चे तर पी. एन. हे ‘भोगावती’ साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. आर्थिकदृष्ट्या दोन्हीही कारखाने अडचणीत आहेत. त्यात ‘कुंभी’वर नरके यांचे बऱ्याच वर्षांपासून वर्चस्व आहे. ‘भोगावती’अलीकडेच पी. एन. यांनी ताब्यात घेतला. त्यामुळे दोन कारखान्यांचा कारभार प्रचाराचा मुद्दा बनला. ‘गोकुळ’वर पी. एन. यांची सत्ता आहे. संघ ‘मल्टिस्टेट’ करण्याच्या निर्णयाविरोधात नरके रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘गोकुळ’वरच सावध हल्ला सुरू केला. कारण त्यांचे चुलते अरुण नरके हेही ‘गोकुळ’चे संचालक आहेत आणि ते नरके यांच्या प्रचारात असल्याने यावर टीका करताना त्यांच्यावर 
मर्यादा येत आहेत. मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे आणि स्पर्धेतील दोन्हीही उमेदवार मराठा आहेत. सलग पराभव झाल्यामुळे पाटील यांना सहानुभूती, तर नरके यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी असल्याचे चित्र आहे. गेल्यावेळी नरकेंसोबत असलेले पी. जी. शिंदे यांच्यासारखे तालुक्‍याचे नेते यावेळी पी. एन. यांच्यासोबत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com