कर्जत-जामखेड : ए भावा रोहितचीच हवा; राम शिंदे पिछाडीवर | Election Results 2019

karjat jamkhed
karjat jamkhed

नगर : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांचीच हवा असल्याचे सुरवातीचे चित्र असून, भाजप  उमेदवार राम शिंदे पिछाडीवर आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते समर्थकांची गर्दी असून, फेरी निहाय निकाल जाहीर होताना, कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. पिछाडीवर पडल्याने राम शिंदे यांच्या समर्थकांच्या चिंता वाढल्या आहेत. तर, रोहित पवार समर्थकांचा उत्साह फेरीनिहाय वाढत जाताना दिसत आहे. पोस्टल मतदानात रोहित पवार तीन हजारांनी आघाडीवर आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपचे नेते पालकमंत्री राम शिंदे त्यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू युवा नेतृत्व रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केलेले आहे. सुरुवातीला पवार यांच्यासमोर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मुंजषा गुंड यांच्या बंडखोरीचे आव्हान उभे केले होते. तथापि, त्यांनी अखेरीस पवार यांच्या पाठिशी ताकद उभी केली. 

पवार व शिंदे यांच्यातील ही लढत राज्याचे लक्ष्य वेधून घेणारी ठरली. रोहीत यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे आदींनी या मतदारसंघात सभा घेतल्या. राम शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सभा घेतली. त्यामुळे या मतदारसंरघात हायटेक प्रचार झाला. त्यामुळे दोघांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली.

काय होते प्रचाराचे मुद्दे?
- स्थानिक उमेदवार की बाहेरचा उमेदवार
- जामखेडचा पाण्याचा प्रश्न; हक्काचे पाणी मिळणार का?
- दुष्काळी भाग ही ओळख पुसून काढणार
- स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळवून देणार
- रोजगारासाठी स्थानिकांचा शहरांकडे ओढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com