पंढरपूर : पाचव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे भारत भालके आघाडीवर : Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पंढरपूर मतदार संघातून यावेळी महायुतीकडून माजी आमदार सुधाकर परिचारकांना भाजपने निवडणूक रिंगणात उतरवले आहे, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आमदार भारत भालकेंंना उमेदवारी दिली आहे.

पंढरपूर : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके हे 1857 मतांनी आघाडीवर आहेत. तर महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या पंढरपूर शहरातूनच भारत भालकेंनी आघाडी घेतल्याने महायुतीच्या गोठात चिंता वाढली आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात सुधाकर परिचारक आणि भारत भालकें यांच्यात हाय व्होलटेज अशीच लढत झाली आहे. या लढतीच्या आजच्या निकालाकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिष्ठेच्य़ा केलेल्या या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडेच लक्ष लागले आहे. निकाल कोणाच्या बाजूने लागणार या विषयीचा स्पपेन्स अजूनही कायम असल्याने उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धाकधुक वाढली आहे.

- सातारला राष्ट्रवादीच आघाडीवर

पंढरपूर मतदार संघातून यावेळी महायुतीकडून माजी आमदार सुधाकर परिचारकांना भाजपने निवडणूक रिंगणात उतरवले आहे, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आमदार भारत भालकेंंना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार समाधान आवताडे आणि काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांनीही आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे.

- दौंड : राहुल कुल यांना आघाडी;थाेरात पिछाडीवर

21 तारखेला झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये एकूण  2 लाख 37 हजार 622 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 71,23 टक्के इतके मतदान झाले. गत निवडणूकीपेक्षा पाच टक्क्यांनी मतदान घटले आहे. हे घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे आज दुपारी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

पंढरपूर मतदार संघामध्ये मागील दोन वेळा आमदार भारत भालकेंनी बाजी मारली आहे. 2019 साली पहिल्यांदा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये  विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचा आमदार भालकेंनी 9 हजारांनी पराभव केला होता.

- जयकुमार गाेरे आघाडीवर ; उदयनराजेे पिछाडीवरच I Election 2019

या निवडणुकीमध्ये प्रथमच माजी आमदार सुधाकर परिचारकांशी आमदार भालकेंच्या सामाना झाला. निवडणुकी दरम्यान आमदार भालकेंच्या अनेक समर्थ कार्यकर्त्यांनी सुधाकर परिचारकांना पाठिंबा दिला होता. त्यातच यावेळी मतदानाची टक्केवारी ही  घटली आहे.

घटलेली टक्केवारी आणि अपक्ष उमेदवार समाधान आवताडे आणि काॅंग्रेस उमेदवार शिवाजी काळुंगे हे किती मतांपर्यंत मजल मारतात. यावरही भालके-परिचारकांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. मतदारसंघात भालके-परिचारक आणि आवताडे या तिन्ही उमेदवारांमध्ये टफ फाईट झाल्याने येथील निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Pandharpur trends morning