खानापूर : अनिल बाबर आघाडीवर | Election Results 2019

खानापूर : अनिल बाबर आघाडीवर | Election Results 2019

विटा - येथील विधानसभा मतदार संघात बाराव्या फेरी अखेर अनिल बाबर यांनी 11471 मतांनी आघाडी घेतली आहे. बाराव्या फेरीत बाबर यांना 80292 तर सदाशिवराव पाटील यांना 68821 मते मिळाली. 

दरम्यान, अकराव्या फेरी अखेर अनिल बाबर यांनी 10,135 मतांनी आघाडी घेतली. अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील व त्यांच्यातच खरी लढत पाहायला मिळत आहे. दोघांचीही आरपारचीही लढाई आहे. अकराव्या फेरी अखेर अनिल बाबर यांना ७५४८७ तर सदाशिवराव पाटील यांना ६५३५२ मते मिळाली. 

दरम्यान, या मतदारसंघात प्रचाराच्या दहा ते बारा दिवसांच्या कालावधीत मतदारसंघात अनेक वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील व शिवसेनेचे उमेदवार अनिल बाबर यांच्यात घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता मतदारसंघात आरपारची लढाई पहावयास मिळत आहे.

सदाशिव पाटील यांनी महाआघाडीतून निवडणूक न लढता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. सर्वपक्षीय माझी उमेदवारी आहे असे सांगत त्यांनी निवडणूक लढली. तरी काँग्रेसमधील त्यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्ते, नेत्यांनी त्यांच्याबरोबर न राहता बाबर यांचे शिवधनुष्य हाती घेतल्याचे पाहायला मिळाले. काही काँग्रेसचे नेते सध्या त्यांच्याबरोबर होते. राष्ट्रवादीने मात्र त्यांना पाठिंबा दिला होता.

२०१४ ला राष्ट्रवादीबरोबर असलेल्या अशोक गायकवाड यांनी यावेळी सदाभाऊंना पाठिंबा दिला आहे. जे आपल्याबरोबर आहेत अशांना घेऊन सदाभाऊ लढाईसाठी सज्ज झाले. अनिल बाबर महायुतीचे उमेदवार असल्याने त्यांच्यामागे अन्य पक्षाचीही ताकद होती. आटपाडीच्या राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांनीही अनिलभाऊंना पाठिंबा दिला.

आटपाडीचे भाजपवासीय देशमुख घराणे मात्र आटपाडीचाच आमदार व्हावा, यासाठी ठाम होते. मात्र खासदार संजयकाका पाटील व मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांची समजूत काढल्याने ते अनिलभाऊंच्या प्रचारात सक्रिय होऊन प्रचार जोमाने केला. गोपीचंद पडळकर व समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनीही अनिलभाऊंच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेऊन कामाला लागले. त्यामुळे अनिलभाऊंच्या मागे मोठी रसद तयार झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com