शिवेंद्रसिंहराजेंचा प्रभाव ; अभिजीत बिचुकलेने गाठली शंभरी I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये खिंडार पाडण्यासाठी भाजपने उमेदवार आयात करण्याचे धोरण अवलंबले आहे.

सातारा - उदयनराजे पिछाडीवर असले तरी त्यांचे चुलतबूंध शिवेंद्रसिंहराजे हे सातारा विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत. शिवेंद्रसिंहराजेंना 24259 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी दीपक पवार यांना 16446 इतकी मते मिळाली आहेत. अभिजीत बिचुकलेंना 133 मते मिळाली आहेत. 

सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले दीपक पवार यांच्यात सरळ लढत आहे. या मतदारसंघात बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये खिंडार पाडण्यासाठी भाजपने उमेदवार आयात करण्याचे धोरण अवलंबले होते. त्यातूनच शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे हे आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झाले. 

उदयनराजे हे मतमाेजणीत प्रारंभापासून पिछाडीवर गेले आहेत. परंतु शिवेंद्रसिंहराजे यांनी मात्र मतांची आघाडी घेतली आहे. सातव्या फेरी अखेर ते 7813 मतांनी पूढे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Satara trends afternoon