Vidhan Sabha 2019 : स्थिरीकरणाचे स्वप्न पूर्ण करणार - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

दुष्काळातून मुक्ती मिळवायची आहे, मोदींचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे विजयदादांचे स्वप्न येत्या पाच वर्षांतच आम्ही पूर्ण करणार आहोत, यासाठी महायुतीचे माळशिरस मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांना आपण आशीर्वाद देऊन आमदार करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले.

विधानसभा 2019 : नातेपुते (जि. सोलापूर) - दुष्काळातून मुक्ती मिळवायची आहे, मोदींचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे विजयदादांचे स्वप्न येत्या पाच वर्षांतच आम्ही पूर्ण करणार आहोत, यासाठी महायुतीचे माळशिरस मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांना आपण आशीर्वाद देऊन आमदार करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले.

माळशिरस  मतदारसंघातील भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नातेपुते येथील पालखी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की राम सातपुते हा उमेदवार विद्यार्थी चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जाहीरनाम्यात सत्तेवर येणार नसल्यामुळे खोटी भरपूर आश्‍वासने दिली आहेत. १५ वर्षे यांनी जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्यांनी जेवढी कामे केली, तेवढी आम्ही पाच वर्षांत दुप्पट केली आहेत. ५० लाख लोकांची कर्जमाफी केली आहे. १५ वर्षे त्यांनी २० हजार कोटींची मदत केली, पाच वर्षांत आम्ही ५० हजार कोटी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 chief minister talking politics