Vidhan Sabha 2019 : आमची शेतकऱ्यांशी बांधिलकी कायम - ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

मला शहरीबाबू म्हणणाऱ्यांना शेतातलं खूप काही कळतंय; पण त्याचा कळण्याचा शेतकऱ्यांना काही उपयोगच नसेल तर त्यांचं शेतीच ज्ञान काय चाटायचं का? मला शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू दिसतात ते पुसण्यासाठी माझा सतत प्रयत्न असतो. सत्ता असो वा नसो, माझी बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडवली.

विधानसभा 2019 : इस्लामपूर - मला शहरीबाबू म्हणणाऱ्यांना शेतातलं खूप काही कळतंय; पण त्याचा कळण्याचा शेतकऱ्यांना काही उपयोगच नसेल तर त्यांचं शेतीच ज्ञान काय चाटायचं का? मला शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू दिसतात ते पुसण्यासाठी माझा सतत प्रयत्न असतो. सत्ता असो वा नसो, माझी बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडवली. 

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारार्थ यल्लमा चौकातील सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, ‘‘खत किती टाकायचं? एफआरपी म्हणजे काय? हे खरंच मला कळत नाही. आणि ते कळून घ्यायची गरजही मला वाटत नाही; मात्र,  मला शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू दिसतात. ते पुसण्यासाठी माझा सदैव प्रयत्न असतो. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, मात्र मला त्याला कर्जमुक्त करायचं आहे. त्यांच्या बॅंक खात्यात दरवर्षी दहा हजार रुपये  द्यायचे आहेत. हा आमचा वचननामा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 islampur constituency uddhav thackeray politics