Vidhan Sabha 2019 : माण : जातीय समीकरणे ठरणार निर्णायक

रूपेश कदम
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

माणमध्ये अतिशय चुरशीची आणि रंगतदार तिरंगी निवडणूक होत आहे. येथे भाजप, शिवसेना आणि ‘आमचं ठरलंय’ आघाडीच्या अपक्ष उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. माजी आमदार जयकुमार गोरे (भाजप), शेखर गोरे (शिवसेना); तर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यात निकराची लढत आहे.

विधानसभा 2019 : माणमध्ये अतिशय चुरशीची आणि रंगतदार तिरंगी निवडणूक होत आहे. येथे भाजप, शिवसेना आणि ‘आमचं ठरलंय’ आघाडीच्या अपक्ष उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. माजी आमदार जयकुमार गोरे (भाजप), शेखर गोरे (शिवसेना); तर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यात निकराची लढत आहे. मतदारसंघात जातीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. हॅट्ट्रिक साधण्याच्या प्रयत्नातील जयकुमार गोरेंना मतदारांसह पक्षातील नेतेमंडळींच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. शेखर गोरे शिवसैनिक आणि समर्थकांच्या जोरावर नशीब आजमावताहेत.

जयकुमार गोरे
बलस्थाने

    गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे. 
    दहा वर्षे आमदार, सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारी.
    निधी आणणे. उरमोडीच्या पाण्याची आवर्तने करण्यात यश.
    दहिवडी नगरपंचायतीसह अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता.

उणिवा
    दहा वर्षांत मतदारांत तयार झालेली नाराजी.
    काँग्रेस सोडल्यामुळे दुरावलेली पारंपरिक मते.

शेखर गोरे
बलस्थाने

    शिवसेनेची उमेदवारी खेचून आणण्यात यश. 
    गावोगावी स्वखर्चातून केलेली विकासकामे. 
    महिला मेळावे घेण्यात मोठे यश. 
    शिवसैनिकांसह कट्टर कार्यकर्त्यांची फळी.

उणिवा
    महायुती एकसंध नसणे.
    आक्रमक स्वभावामुळे दुखावलेले कार्यकर्ते.
    निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अभाव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 maan constituency politics