Vidhan Sabha 2019 : पंढरपुरातून भालके दाखल करणार अर्ज

हुकूम मुलाणी 
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

लोकसभेला पंढरपूरात सगळे मातब्बर एक झाले, जर ई.व्ही एम मध्ये गडबड असती तर काॅग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळाले नसते. जनतेच्या प्रश्नासाठी झटणारा मी आमदार असून त्यांच्यासाठी भले माझी प्रकृती गमावली, पण त्यांच्या प्रश्नाचा पाठपुरावा सोडला नसल्याचे सांगत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आ. भारत भालके यांनी सांगितले.

मंगळवेढा - लोकसभेला पंढरपूरात सगळे मातब्बर एक झाले, जर ई.व्ही एम मध्ये गडबड असती तर काॅग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळाले नसते. जनतेच्या प्रश्नासाठी झटणारा मी आमदार असून त्यांच्यासाठी भले माझी प्रकृती गमावली, पण त्यांच्या प्रश्नाचा पाठपुरावा सोडला नसल्याचे सांगत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आ. भारत भालके यांनी सांगितले.       

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशानंतर मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की ज्यांच्या पंचवीस वर्षे आमदारकित, पाच वर्षे विरोधी पक्षात, उर्वरित 20 वर्षे सत्ताधारी पक्षात काम केले असता विधानसभेत यांची उपस्थिती किती, आणि जनतेच्या विकासाचे प्रश्न किती मांडले, याची तुलना करताना माझ्या दहा वर्षांच्या काळात मी विधानसभेत 84 टक्के उपस्थिती दाखवत सर्वाधिक प्रश्न विचारले. हुन्नुर येथे रस्ते विकास कामाचे उद्घाटन करत असताना माध्यमांनी मी मातोश्रीच्या भेटीस गेल्याचे वृत्त छापून माध्यमानी मतदारांशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

वास्तविक पाहता 2004 च्या निवडणुकीनंतर मी मातोश्रीवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मी कधीही गेलो नाही. विधानसभेसाठी मला स्वाभिमानी, शिवसेना, भाजपाकडून काही संपर्कात होते. परंतु मी जनमताचा आदर करणारा असून त्यांच्या मनातील प्रश्न विचारून मी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून तर काल दिवसभरात दोन हजार पेक्षा अधिक कार्यकत्याची योग्य निर्णय घेतल्याचे संदेश दिला. काम करताना मी गरीब श्रीमंत व गट तट न मानता काम केल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व गट एकत्र असताना देखील मी सुशिलकुमार शिंदेला सात हजार पेक्षा अधिक मताधिक्‍य देऊ शकलो. पाणी प्रश्नाबाबत आवाज उठवूनही जलसंधारण मंत्री ना. सावंत पाण्याबाबत मी काहीच बोललो नसल्याचा आरोप केला. शैला गोडसे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संपर्क वाढवला. त्यांच्या पक्षाचा उमेदवार नाही तर सत्ताधारी भाजपचा उमेदवार असल्यामुळे जो उमेदवार आहे कडकनाथच्या पक्षाचा उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक जनतेच्या हातात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra vidhansabha 2019 Pandharpur bharat bhalke NCP politics