Vidhan Sabha 2019 : अखेर शैला गोडसे यांचा अपक्ष अर्ज दाखल

हुकूम मुलाणी
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

शिवसेनेच्या हक्काची असलेली पंढरपूरची जागा रयत क्रांतीला दिल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्याने शिवसेनेतून इच्छुक असलेल्या शैला गोडसे यांना अपक्ष अर्ज दाखल करण्याचा आग्रह केल्याने अखेर त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान पक्षाच्या नेत्या समोर उभे राहिले आहे.

विधानसभा 2019 : मंगळवेढा - शिवसेनेच्या हक्काची असलेली पंढरपूरची जागा रयत क्रांतीला दिल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्याने शिवसेनेतून इच्छुक असलेल्या शैला गोडसे यांना अपक्ष अर्ज दाखल करण्याचा आग्रह केल्याने अखेर त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान पक्षाच्या नेत्या समोर उभे राहिले आहे.

शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश करण्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून मंगळवेढा मध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यात त्यांनी पाण्यासह, इतर आंदोलने व महिलांच्या महिलांच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेत आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्या शिवसेनेतून उमेदवारीच्या दावेदार झाल्या, अशा परिस्थितीत मंगळवेढा येथे झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये जलसंधारण मंत्री ना. तानाजी सावंत यांनी हा मतदारसंघ सोडणार नसल्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे शिवसैनिकांच्या आशा आणखीनच पल्लवीत झाल्या.

जलसंधारण मंत्री सावंत यांनी आपली ताकद ज्याप्रमाणे करमाळा व  शहर मध्यसाठी पणाला लावली, त्याप्रमाणे पंढरपूरमध्ये आपली ताकद पणाला लावली नसल्याची खंत शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे. शेवटी दोन वर्षापासून तयारी केलेल्या गोडसे यांना अपक्ष अर्ज दाखल करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. या मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली असून, दुसरे भाजपमधील इच्छुक समाधान आवताडे हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VidhanSabha 2019 shaila Godse Independent Form Politics