Vidhan Sabha 2019 : बोलण्यात अडखळणारे पालकमंत्री लिहिण्यातही गडबडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत भाषण करताना उपस्थितांची नावे घेण्यात अडखळणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आज विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरतानाही गडबडले. उमेदवारी अर्जात विचारलेल्या केंद्र व सरकारच्या लाभाच्या पदाच्या रकान्यात त्यांनी त्यांच्याकडील राज्यमंत्री पदाचा उल्लेख केला होता. नंतर त्यांनी ही माहिती खोडून लाभाचे पद मिळाले नसल्याचा उल्लेख केला आहे.

विधानसभा 2019 : सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत भाषण करताना उपस्थितांची नावे घेण्यात अडखळणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आज विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरतानाही गडबडले. उमेदवारी अर्जात विचारलेल्या केंद्र व सरकारच्या लाभाच्या पदाच्या रकान्यात त्यांनी त्यांच्याकडील राज्यमंत्री पदाचा उल्लेख केला होता. नंतर त्यांनी ही माहिती खोडून लाभाचे पद मिळाले नसल्याचा उल्लेख केला आहे. 

उमेदवाराने भरून द्यावयाच्या अर्जातील भाग तीन अ मधील बाराव्या मुद्यात उमेदवार भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या अखत्यारितील कोणतेही लाभाचे पद करीत आहे किंवा नाही या प्रश्‍नाचे उत्तर पालकमंत्री देशमुख यांनी सुरवातीला होय लिहिले होते. नंतर त्यांनी होय हे उत्तर खोडून नाही असे लिहिले आहे. या पदाचा तपशील म्हणून त्यांनी राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य, राज्य उत्पादन शुल्क व परिवहन राज्यमंत्री असा केला होता. या माहितीला देखील पालकमंत्री देशमुख यांनी नंतर खोडले आहे. पालकमंत्री देशमुख यांच्या अर्जावर सूचक म्हणून भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी स्वाक्षरी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VidhanSabha 2019 vijaykumar deshmukh form confusion politics