Maratha Kranti Morcha : पाटण : तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पाटण (सातारा) - सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणी सह इतर मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरुवात येथील तहसिल कार्यालयासमोर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी केली.

सकाळी १० वाजल्यापासून नविन बस स्थानक परिसरात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तालुक्यातील विविध भागातुन जमा होऊ लागले. बस स्थानक परिसरात मराठा मोर्चा कार्यालयात उद्घाटन केल्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. कराड-चिपळुन महामार्गावरुन मोर्चा झेंडाचौक, लायब्ररी चौक, राजवाडा, आंबेडकरनगर मार्गे तहसिल कार्यालयासमोर आला.

एक मराठा लाख मराठा, आरक्षण मिळाले पाहिजे अशी मराठा समाज बांधवांनी घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणुन गेला होता. मोर्चा तहसिल कार्यालयासमोर आल्यानंतर मराठा भगिनिंच्या  हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. समन्वयकांनी ठिय्या आंदोलन आचारसंहिता सर्वांना सांगितली. यामध्ये येते कोणी नेता नाही सर्वजण मराठा बांधव म्हणुन एकत्र आलो असल्याचे प्रतिपादन केले. ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाल्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यस्त केले. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते.

Web Title: #Maharashtrabandh Maratha Kranti Morcha : Patan: Static agitation against Tehsil office