Maratha Kranti Morcha : नागठाणे येथे 'महाराष्ट्र बंद'ला मोठा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नागठाण्यासह बोरगाव,  भरतगाव, अतित, अपशिंगे ( मिलिटरी), देशमुखनगर, वेणेेगाव, निसराळे, सासपडे आदी गावांमधून शंभर टक्के बंद पाळून उस्फूर्त प्रतिसाद दिला.

नागठाणे : मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाच्या समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला नागठाण्यासह परिसरातील गावांमधून उस्फूर्त पाठिंबा मिळाला आहे.

नागठाण्यासह बोरगाव,  भरतगाव, अतित, अपशिंगे ( मिलिटरी), देशमुखनगर, वेणेेगाव, निसराळे, सासपडे आदी गावांमधून शंभर टक्के बंद पाळून उस्फूर्त प्रतिसाद दिला. नागठाणे येथील शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये, दूध डेअऱ्या बंद होत्या. महामार्गावर वाहतुकही सकाळपासूनच ठप्प होती. बंदच्या पार्श्वभूमीवर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील गावांमधून तसेच महामार्गावर अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: #MaharashtraBandh Nagthane huge support for maharashtra bandh