Maratha Kranti Morcha काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आंदोलनात सहभागी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नगर : शहरात सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आंदोलनास सुरवात झाली. या आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले. 

बापूसाहेब निंबाळकर महाराज यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार घातल्यानंतर माधव सावंत यांनी आरक्षणावर गझल सादर केली. त्यानंतर चौकात ठिय्या देऊन आंदोलनास प्रारंभ झाला. सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी विखे पाटील आंदोलनस्थळी आले. आंदोलकांसमवेत त्यांनीही रस्त्यावर ठिय्या दिला.

यादरम्यान आलेल्या दोन रूग्णवाहिकांना आंदोलकांनी रस्ता रिकामा करून दिला. दरम्यान, शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा बंद आहेत. सुमारे दोनशे युवकांनी मोटारसायकल फेरी काढून शहरात बंदचे आवाहन केले.

Web Title: #MaharashtraBandh Radhakrushn Vikhe Patil attends Agitation