महाराष्ट्राचा सुपूत्र बनला राजस्थानील महिलेसाठी देवदुत

Maharashtra's son Angel for rajasthani  women
Maharashtra's son Angel for rajasthani women

उपळाई बुद्रूक (जिल्हा-सोलापूर) : पाकिस्तान मध्ये मृत पावलेल्या भारतीय महिलेच्या कुटुंबासाठी महाराष्ट्र राज्याचे सुपूत्र तथा बाढमेरचे (राजस्थान) जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते जणु देवदूतच बनले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांनी 26 वर्षांनंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील मुनाबाव -खोखरापार प्रवेशद्वार प्रथमच उघडुन महिलेचा मृतदेह भारतात आणला. विशेष म्हणजे याच काळात जिल्हाधिकारी नकाते यांच्या पत्नी दवाखान्यात प्रसृतीसाठी दाखल झालेल्या होत्या. त्यांच्यासोबत थांबणे आवश्यक असताना देखील पत्नीच्या प्रसृतीकडे दुर्लक्ष करत नागरीकांच्या मदतीला आलेला हा पहिलाच अधिकारी राजस्थान राज्यातील जनतेला पाहिला मिळाला आहे.

राजस्थान राज्यातील बाडमेरच्या अगासडी येथील रेश्मा खान (वय 66) व मुलगा शायब खान हे दोघे ता. 30 जून रोजी पाकिस्तान मध्ये छिपरा येथे नातेवाईकांना भेटायला गेले होते. रेश्मा यांचे 25 जुलै रोजी तापाच्या आजाराने निधन झाले. आईचा दफनविधी भारताच्या मातृभुमीत व्हावा अशी मुलगा शायबची व जादमची इच्छा होती. परंतु 28 जुलै रोजी व्हिसा संपत असल्याने अनेक अडचणी समोर दिसत असल्याने भारतातील नातेवाईकांना काय करावे सुचत नव्हते. याबाबत राजस्थान राज्यातील अनेक वृत्तपत्रांनी याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या. हि घटना जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते यांना समजताच त्यांनी तातडीने गृहमंत्रलाय, परराष्ट्र खात्याशी व भारतीय दुतवास यांच्याशी संपर्क साधला. सुषमा स्वराज्य यांनी पाकिस्तानच्या अजय बिस्सार यांना मदत करण्यास सांगितले.

रेश्मा खान यांचा मृतदेह 28 जुलैला भारतात आणण्यासाठी जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते यांनी वरीष्ठ पातळीवर संपर्क साधुन भारतातून पाकिस्तानला आठवड्यातुन एकदाच जाणारी थार एक्सप्रेस हि रेल्वे एक तास खोखरापार स्टेशनला थांबवुन घेतली. परंतु व्हिसाच्या कागपत्रांची पुर्तता न झाल्याने मृतदेह त्यादिवशी आणता आला नाही. भारत-पाक सीमेवरील मुनाबाव-खोखरापार प्रवेशद्वारवरून पायी चालत जाण्यास परवानगी नसल्याने 
या मार्गाव्यतीरिक्त वाघा बॉर्डर व विमानाने मृतदेह आणण्याची तयारी जिल्हाधिकारी नकाते व स्थानिक आमदार यांनी केली होती. त्यासाठी सरकारकडून व सीमेवरील सीमा सुरक्षा दलाची परवानगी घेतली.

 परंतु पाकिस्तान सरकारकडुन परवानगी मिळण्याची प्रतिक्षा होती. अखेर 30 जुलैला पाकिस्तान सरकारने मृतदेह देण्यास परवानगी दिली. जिल्हाधिकारी नकाते यांच्या अथक प्रयत्नाने राजस्थान राज्यातील मुनाबाव-खोखरापार प्रवेशद्वार उघडण्यास भारत-पाक सरकारने परवानगी दिली. याठिकाणी रेश्मा खान यांचा मृतदेह सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या जवनांकडुन ताब्यात घेतला. उत्तोरत्तर तपासणी केल्यानंतर रेश्मा यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. रेश्मा खान यांचा मृतदेह 7 दिवसात भारतात आणला. यासाठी जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.

रेश्मा खान यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी चांगले काम माझ्या हातून झाले. याचे मला समाधान वाटले. 

- शिवप्रसाद नकाते 
जिल्हाधिकारी बाढमेर राजस्थान

भारतात आल्यावर स्वातंत्र्य मिळाले: शायब.
मुनाबाव-खोखरापार प्रवेशद्वार पार करून भारतात आल्यानंतर शायब खान याने भाऊ जादम याच्या गळ्यात पडुन पाकिस्तानात तुरूवासांत असल्यासारखे वाटत होते. भारतात आल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यासारखी भावना व्यक्त केली. 

मुनाबाव-खोखरापार प्रवेशद्वार प्रथमच उघडले
- भारत-पाक सीमेवरील पंजाब येथील वाघा बॉर्डरवरून पायी जाण्यास परवानगी आहे. तर राजस्थान येथील भारत-पाक सीमेवरील मुनाबाव-खोखरापार प्रवेशद्वारवरून फक्त रेल्वेला प्रवेश आहे. परंतु जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते व परराष्ट्रखाते यांच्या प्रयत्नांनी रेश्माचा मृतदेह आणण्यासाठी प्रथमच हा प्रवेशद्वार उघडण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com