पाचशे रुपयांची लाच घेताना इचलकरंजीत महावितरणचा कर्मचारी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 July 2019

इचलकरंजी - नवीन वीज कनेक्शन मंजूर झाल्यानंतर त्याचे कोटेशन तयार करण्यासाठी 500 रूपयाची लाच घेताना येथील महावितरणच्या कार्यालयात कर्मचार्‍यास रंगेहाथ पकडण्यात आले. या कार्यालयात गेल्या काही महिन्यात ही दुसरी कारवाई झाल्यामुळे खळबळ माजली आहे.

येथील स्टेशन रोडवर महावितरण विभागाचे कार्यालय आहे. या ठिकाणी कार्यरत असणारे अनिल महावीर नांद्रे याने एका ग्राहकास मंजूर झालेल्या वीज कनेक्शनचे कोटेशन करण्यासाठी 500 रूपयाची मागणी केली होती. याबाबतची तक्रार संबंधीत ग्राहकाने लाचलुचपत विभागाकडे केली होती. आज दुपारी लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून नांद्रे याला 500 रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण कार्यालयात खळबळ माजली.

दरम्यान महावितरण कार्यालयाबाबत गेल्या काही महिन्यापासून अनेक तक्रारी वाढू लागल्या आहेत. यापूर्वीही येथील कार्यालयातील कर्मचार्‍यास लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले होते. गेल्या काही महिन्यात ही दुसर्‍यांदा कारवाई झाल्यामुळे या कार्यालयातील व्यवहार स्पष्ट झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavitran employee arrested in Bribe case