मोहोळ : वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे 90 लाखांचे नुकसान

राजकुमार शहा 
शनिवार, 19 मे 2018

गेल्या आठवडयापासून मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्याने धुमाकुळ घातला आहे. तसेच विजेचा कडकडाट ही मोठया प्रमाणात वाढला आहे. दुपारी चार वाजल्यापासुन वादळी वाऱ्याला सुरवात होते. त्याच बरोबर विजेचा कडकडाट वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांत घबराट पसरली आहे.

मोहोळ : गेल्या आठवडयापासुन मोहोळ तालुक्यात सूरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे विजेचे खांब मोडुन तसेच ट्रान्सफॉर्मर जळुन संपुर्ण विज पुरवठा खंडीत व विस्कळीत झाला असून महावितरणचे सुमारे 90 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती सहाय्यक अभियंता अनिल अंकोलीकर यांनी दिली. 

गेल्या आठवडयापासून मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्याने धुमाकुळ घातला आहे. तसेच विजेचा कडकडाट ही मोठया प्रमाणात वाढला आहे. दुपारी चार वाजल्यापासुन वादळी वाऱ्याला सुरवात होते. त्याच बरोबर विजेचा कडकडाट वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांत घबराट पसरली आहे. तालुक्यातील नरखेड, शेटफळ, अनगर, पेनूर, बेगमपुर, लांबोटी या परिसरातील उच्चदाब वाहिनीचे 25 व लघुदाब वाहिनीचे 70 सिमेंट खांब मोडले आहेत. तर विज पडुन दहा ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत. बिटले येथे ट्रान्सफॉर्मर चा मनोरा कोसळला आहे.

सध्या सिमेंटच्या खांबाचा तुटवडा असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. वरिष्ठांकडे खांबांची मागणी केली आहे. मात्र ते येईपर्यंत पडलेल्या खांबा पैकीच जे खांब चांगले आहेत यांची तपासणी करून ते उभा करून विद्युत पुरवठा सुरू करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यासाठी गँग व जनमीत्र असे मिळुन 50 जण कार्यरत आहेत. जो भाग विद्युत पुरवठ्यापासुन पुर्ण वंचित आहे. त्या भागातील विद्युत पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. खंडीत व विस्कळीत विजपुरवठ्या मुळे  अनेक गावचा पाणी पुरवठा  विस्कळीत झाला आहे.

Web Title: mahavitran in mohol

टॅग्स