"शेतकऱ्यांची लूट सुरूच; ऊसतोडीसाठी रक्कम मागितल्यास धिंड काढू"

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

ऊस तोडकरी मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. एकरी पाच ते दहा हजार रुपये तोडणीसाठी मोजावे लागत आहेत.

सांगली  : ऊस तोडकरी मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. एकरी पाच ते दहा हजार रुपये तोडणीसाठी मोजावे लागत आहेत. तोडणी मजुरांनी लूट थांबवावी अन्यथा लूट करणाऱ्या तोडणी मजुराची गाढवावरून वरात काढू, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आज दिला.

 खराडे म्हणाले, ‘‘सध्या जिल्ह्यात तोडणी मजुरांची संख्या अपुरी आहे. त्यातच ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्याचाच गैरफायदा मजूर आणि मुकादम घेताना दिसत आहेत. शेतकऱ्याला अव्वाच्या सव्वा पैसे मागितले जात आहेत. एकरी पाच ते दहा हजार रुपये मोजल्याशिवाय उसाची तोडणी होत नाही. त्याशिवाय ट्रॅक्‍टर चालकाची एंट्री वेगळी द्यावी लागते. ही वस्तुस्थिती आहे. अगोदरच कारखानदार शेतकऱ्यांना लुटत आहेत.  तोडणी मजुरांची त्यात भर पडली आहे. कारखानदारही काहीच बोलत नाहीत.

हेही वाचा- चार हजारांवर शेतकऱ्यांना फटका; अनुदान बंदच

काही मुकादम तर रोखीने जागेवर पैसे पाहिजेत काय, अशी विचारणा करून रोखीने दोन हजार ५०० रुपये टनाने शेतकऱ्यांना पैसे देतात. ऊस आपल्या नावावर पाठवितात. कारखान्याकडून २८०० ते ३००० हजार रुपये घेतात. हा नवा धंदा बेडग परिसरात सुरू आहे.
- महेश खराडे

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahesh kharade warn money for sugarcane remove the agitation sangli marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: